| TOR News Network | Raj Thackeray Latest News : गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले. राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह विरोधकांनी जोरदार टीका केली. मोदींना टीका करणाऱ्यांनीच भूमिका बदलल्याचा हल्ला या नेत्यांनी चढवला. त्याला राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Raj Thackeray to Uddhav Thackeray)
मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून किंवा 40 आमदार फुटले म्हणून मी टीका करत नाही. मोदींच्या सुरुवातीच्या पाच वर्षाची कामगिरी पटली नाही. त्यामुळे मी त्यांना टीका केली. नंतरच्या पाच वर्षात त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांचं कौतुकही केलं. (Appreciated him for doing a good job) याला भूमिका बदलणं म्हणत नाही. याला धोरणावर किंवा मुद्द्यांवरचं भाष्य म्हणतात, असा हल्लाच राज ठाकरे यांनी चढवला आहे.(Raj Thackeray on modi)
राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मनसेचा एकही उमेदवार या निवडणुकीत नसणार आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.(Raj Thackeray’s stand shocked people) तर मनसे पदाधिकारीही या निर्णयावर नाराज झाल्याने त्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसेत खळबळ उडालेली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केले.
2014 च्या आधीच भूमिका ही निवडून आल्यावर तिकडे बदलू शकते तर मलाही भूमिका बदलणं आवश्यक होतं. सगळे म्हणतात, राज ठाकरेंनी भूमिका बदलली पण याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत, तर धोरणांवर टीका म्हणतात, असे सांगत राज यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला. (Raj Thackeray targeted Uddhav Thackeray) मात्र त्या बदल्यात काही मागितलं नव्हतं. मला मुख्यमंत्री पद हवं म्हणून टीका करतो, माझे 40 आमदार फुटले म्हणून टीका करतोय, असा काही माझा हेतू नव्हता. ज्या भूमिका मला पटल्या नाहीत, त्यावर मी तेव्हा स्पष्टपणे बोललो.
भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तीन पक्षाच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा कुणाशी बोलायचं आणि पुढे कशाप्रकारचं जायचं त्याची यादी दोन दिवसात तयार होईल. (The list will be ready in two days) त्यांच्यापर्यंत जाईल. आमचेही पदाधिकारी असतील त्यांना योग्य मानाने वागवतील अशी अपेक्षा आहे. कुणाशी संपर्क साधायचा याचा घोळ नको म्हणून यादी देऊ. त्यांनाही सोयीस्कर जाईल. पूर्णपणे सहकार्य करायचं आहे. पूर्ण प्रचार करायचा आहे. संपर्क साधल्यावरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे ते म्हणाले.