Saturday, January 18, 2025

Latest Posts

काल राज ठाकरे गोंधळलेले वाटत होते : आखिर कहना क्या चाहते हो

| TOR News Network | Anjali Damania on Raj Thackeray : मनसेचा काल गुढी पाडवा मेळावा पार पडला.यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मात्र आता विविघ राजकीय पक्षांकडून व नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करणे सुरु केले आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील भाष्य केलं आहे. दमानिया म्हणाल्या काल राज ठाकरे गोंधळलेले दिसून आले. आखिर कहना क्या चाहते हो असा सवाल त्यांनी केला.(Anjali Damania on Raj Thackeray)

अंजली दमानिया म्हणाल्या, “राज ठाकरेंचं भाषण जर आपण ऐकलं तर ते सैरभैर झालेले दिसले. (Raj Thackeray looked confused) त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर टीका केली. नोटाबंदीवर बोलले, रोजगार नाही यावर बोलले. एकीकडं बोलले मोदींचं काम ठीक नव्हतं म्हणून २०१४-१९ मध्ये मी टीका केली. मला खुर्ची नको होती त्यातच ते मध्येच एखादा टोला उद्धव ठाकरेंनाही मारत होते”

यामध्ये ते फक्त आपल्या भूमिकांचं जस्टिफिकेशन देत होते. मध्येच त्यांनी मीडियावर एक टोमणा मारला. जसं राज ठाकरे एरव्ही बोलतात, तसं कालचं भाषण नव्हतं. (As Raj Thackeray always says, yesterday’s speech was not like that) त्यांच्या भाषणात काही कॉमेडी असते तसंही त्याचं नव्हतं. ते गोंधळलेले वाटत होते त्यामुळं मी भाषणानंतर ट्विटही केलं होतं की, आखिर कहना क्या चाहते हो. त्यांना नक्की काय म्हणायचं होतं हेच लोकांना कळेना, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.

एवढ्या लांबून त्यांचे कार्यकर्ते काल आले होते पण त्यांचं भाषण पहिल्यांदाच अगदी छोटसं भाषण झालं. हे भाषण ऐकून मनसेचे कार्यकर्ते देखील नाराज झाले असतील. (Raj Thackeray Speech Was natural) पण काल त्यांनी भाजपला पाठिंबा दिला पण आधीच ते दोन-तीन वेळी म्हणाले की, राजकारणातील व्याभिचाऱ्याला राजमान्यता देऊ नका.

पण त्यानंतर लगेचच त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. यामुळं त्यांच्या मागे ईडीचं चक्र होतं म्हणूनच त्यांनी पाठिंबा दिला का? अशा प्रश्नही मनात येतो. (Was Ed back to Raj Thackeray) पण हा बिनशर्त पाठिंबा देताना कारण काहीच नव्हतं. कारण तुम्हाला लोकसभेची खुर्ची नाही, राज्यसभा नाही. तुम्हाला काहीच नाही आणि तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. इतकं काही सध्या लोककल्याण करणारे राजकारणी उरलेले नाहीत.

Latest Posts

Don't Miss