Saturday, January 11, 2025

Latest Posts

लाव रे तो व्हिडिओ वाले ठाकरे,नरेंद्र मोदी एकाच मंचावर

Theonlinereporter.com – May 15, 2024

Raj Thackeray Latest News : गेल्या लोकसभेच्या निवडणूकीत लाव रे तो व्हिडिओ असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच पंतप्रधानांसोबत मंचावर असणार आहेत. (Raj thackeray Pm modi on one stage) राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणूक भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. 17 मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येत आहे. (Modi Rally At shivaji park )ही सभा आता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वी मुंबईत घडामोडींना वेग आला आहे.

17 मे रोजी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी पार्कवरील सभेत एकत्र दिसतील. (17 may Raj thackeray modi will come together for rally in mumbai) त्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. (Bawankule meet raj thackeray) या सभेचं निमंत्रण, हिंदूत्वाचा अजेंडा आणि मराठी मतांचा टक्का यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. राज ठाकरे यांच्यामुळे मुंबई आणि परिसरात मराठी टक्का खेचून आणण्याचा प्रयत्न महायुती करणार आहे. मनसेने भाजपला निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसे महायुतीच्या प्रचार करत आहे.

मुंबईत शिवसेना ठाकरे गटांची मते मनसेच्या माध्यमातून महायुतीकडे कशा पद्धतीने वळवता येतील यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या अगोदर महायुतीच्या सर्व उमेदवारांनी येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवस प्रचारासाठी राहिला असताना 17 तारखेला राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. (Raj thackeray speech on 17 may)

मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेसाठी अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यासाठी शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहे. यावेळी महायुतीतील दिग्गज नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री उपस्थित असतील. मुंबईसह राज्यातून ही मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असेल. मुंबईतील मराठी माणसांच्या मतावर महायुतीचा डोळा आहे.

Latest Posts

Don't Miss