Thursday, January 16, 2025

Latest Posts

काँग्रेसला धक्का : मुश्ताक अंतुले राष्ट्रवादीत, अनंत गीते अडचणीत

| TOR News Network | Mushtaq Antuley Raigad News : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे जावई (A r Antuley son in law left congress) आणि महाराष्ट्र काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.(Congress Leader Mushtaq Antulay Joined Ncp) रायगड जिल्ह्यातील मुश्ताक अंतुले हे अल्पसंख्याक चेहरा म्हणून ओळखले जातात. मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याने महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार अनंत गीते यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. (In raigad anant geete in trouble)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे राजकीय वारसदार आणि गेली 40 वर्षे राजकारणात कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.(Mushtaq Antulay left congress) राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत एमसीए लाउन्ज, गरवारे क्लब, वानखडे स्टेडियम मुंबई येथे हा प्रवेश सोहळा झाला, दादांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाट चालत आहे, असं सुनील तटकरे यावेळी म्हणालेत.

कोण आहेत अब्दुल रहमान अंतुले?

अंतुले हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नावाजलेले नेते आहे. 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे 8 वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. (Former cm of maharashtra a r antuley) ते भारताच्या 14 व्या लोकसभेचे खासदार देखील होते आणि त्यांनी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणूनही काम केले आहे. अंतुले त्यांच्या जलद निर्णयासाठी ओळखले जात होते आणि त्यांनी पदावर असताना अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी स्थापित केलेल्या ट्रस्टच्या फंडासाठी बिल्डर्सकडून देणग्या घेतल्याच्या आरोपानंतर 1982 मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली.

अजितदादा गटाचं बळ वाढलं

दरम्यान, कोकणात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. हा प्रचार सुरू असतानाच आता कोकणातील अजितदादा गटाचं बळ वाढणार आहे. मुश्ताक अंतुले यांच्या प्रवेशानंतर अल्पसंख्याक वर्ग अजितदादा गटाकडे वळण्याची चिन्हे आहेत. रायगडमधुन ठाकरे गटाने अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांना मैदानात उतरवलं आहे.दोन्ही नेत्यांमध्ये तगडी टक्कर असतानाच अंतुले अजित पवार गटात आल्याने दादांचे बळ वाढल्याचे बोलले जात आहे.

Latest Posts

Don't Miss