| TOR News Network | Rahul Narwekar Latest News : जस जसे दिवस पुढे जात आहेत तस तसे राजकीय पक्ष लोकसभेच्या निवडणूकीची आपली रणनीती आखत आहेत. राज्यात आता भारतीय जनता पार्टीने नवा गेम प्लॅन तयार केला आहे. यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (Rahul Narwekar Contest Loksabha)
दक्षिण मुंबईवर भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेक यांना थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरवण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकर यांना निवडणूक लढण्याचे आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दक्षिण मुंबईवर भारतीय जनता पक्षाने दावा
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगकडूनही तयारी केली जात असून लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षही कसून तयारीला लागले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात भाजपाने कंबर कसून तयारी केली असून एक मोठी खेळी केली आहे. दक्षिण मुंबईवर भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे.(BJP claims South Mumbai For Loksabha) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेक यांना थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरवण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकर यांना निवडणूक लढण्याचे आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अरविंद सावंत यांच्याविरोधात नार्वेकर मैदानात उतरणार असल्याचे वृत्त आहे.(Arvind sawant Vs Rahul Narwekar)
निकाला पहिले नार्वेकरांचं महत्वाचं विधान म्हणाले…
दक्षिण मुंबईत भाजपतर्फे विविध कार्यक्रम
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी उच्च वर्गीय आणि मुस्लिम नागरिकांचं प्राबल्य आहे. या भागात मराठी उमेदवार अनेकवेळा निवडून आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सध्या इथले खासदार आहेत. (South Mumbai Loksabha Seat) आणि त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याचं समोर येत आहे. राहुल नार्वेकर हे कोकणी , मराठी चेहरा आहे. त्यामुळे त्यांना या भागात निवडणुकीसाठी उतरवण्यास भाजप सज्ज झालं आहे. त्या अनुषंगाने नार्वेकर यांनी अनेक कार्यक्रमासही सुरूवात केली आहे. दक्षिण मुंबईचा हा मतदारसंघ घेण्यासाठी भाजपतर्फेही विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.