Sunday, January 12, 2025

Latest Posts

तर आमदार अपात्रतेचा निर्णय रिव्हर्स होऊ शकतो

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य

Rahul Narwekar Latest Statement : राहुल नार्वेकर यांच्या निकालावर शिवसेनेचे दोन्ही गट असंतुष्ट असून दोन्ही गटांनी न्यायालयात धाव घेतली आहेच. यावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी नार्वेकर म्हणाले, मी कोणालाही संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिलेला नाही. मी कायद्याला धरूनच हा निकाल दिला. कायद्याच्या अनुषंगाने आणि संविधानातील तरतुदींचं पालन करून, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायलयाच्या तत्वांच्या आधारावर हा निकाल दिला आहे. (Rahul Narvekar on Mla Disqualification in Mumbai)

दरम्यान, नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी मुंबईतील विधान भवनात या निकालाचं वाचन केलं. राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्वाळा दिला. तसेच शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरवलं. त्याचबरोबर नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांनाही पात्र ठरवलं आहे.

दोन्ही गटाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर राहुल नार्वेकर म्हणाले, आपल्या देशात कोणताही नागरिक संविधानाच्या कलम २२६ आणि कलम ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात निश्चितपणे दाद मागू शकतो. त्यांनी याचिका दाखल केली म्हणजे मी दिलेला निर्णय अयोग्य ठरला असं होत नाही. माझा निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात काही नियमबाह्य आहे का? त्यात काही घटनाबाह्य आहे का? अथवा काही बेकायदेशीर घडलंय का? ते न्यायालयाला दाखवावं लागेल. तसं सिद्ध केलं तरच तो निर्णय रिव्हर्स होऊ शकेल (मागे घेतला जाईल) Then Mla Disqulafication case can be reversed.

Latest Posts

Don't Miss