Thursday, January 16, 2025

Latest Posts

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! CBI कडून नागरिकत्वाविषयी चौकशी सुरू

| TOR News Network |

Rahul Gandhi Latest News : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत चौकशी व्हावी याबाबतची याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. (Delhi High Court) तसंच अलहाबाद उच्च न्यायालयातही भाजप कार्यकर्ता एस विघ्नेश शिशिर यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती. त्यानुसार राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू करण्यात आली आहे. (CBI Started inquiry of Rahul gandhi )

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावर सीबीआय (Central Bureau of Investigation) चौकशी करत आहे. दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली. न्यायालयाला सांगण्यात आले की, या मुद्द्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयात एक जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आहे ज्यावर सुनावणी सुरू आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे.(Rahul Gandhi citizenship inquiry started) त्यावर न्यायालयाने म्हटले की, कोणताही विरोधाभासी आदेश काढू इच्छित नाही. एकाच मुद्द्यावर दोन समांतर याचिकांवर सुनावणी होऊ शकत नाही. या संदर्भातील पुढील सुनावणी 6 डिसेंबर रोजी होणार आहे.

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, एकाच प्रकरणाची दोन वेगवेगळ्या न्यायालयात सुनावणी होऊ शकत नाही. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते विघ्नेश शिशिर यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते विघ्नेश शिशिर यांनी सांगितले होते की, अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी प्रगत टप्प्यावर आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयला पत्र लिहिले होते.

दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत राहुल गांधींविरोधात एफआयआर नोंदवून त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयात सीलबंद कव्हरखाली अहवाल दाखल केला आहे.

भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी राहुल गांधी यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे. सुब्रमण्यम स्वामी हेही या प्रकरणात याचिकाकर्ते आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान त्यांच्या वतीने सांगण्यात आले की, ‘आमची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सीबीआय तपासाचे आदेश अद्याप आलेले नाहीत. 29 एप्रिल 2019 रोजी त्यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिले होते, परंतु कोणतेही उत्तर मिळाले नाही.

Latest Posts

Don't Miss