Thursday, January 16, 2025

Latest Posts

अन् Rahul Gandhi ची ही कृती अनेकांना भावली

विरोधकांना नेहमी धारेवर धरणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतेच उत्तराखंडमधील केदारनाथ धामला भेट दिली. तशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. (Rahul Gandhi In Kedarnath )तेथे त्यांनी दर्शन घेत पूजा देखील केली. यावेळी त्यांनी केलेली एका कृती अनेकांना भावली आहे.

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून तळागळातील जनते पर्यंत पोहचण्या प्रयत्न राहुल गांधी यांच्या कडून केल्या जात आहे. कधी ते ट्रक चालकांच्या तर कधी वाहन दुरुस्ती करणाऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.राहुल गांधी यांनी रविवारी खासगी हॅलिकाॅप्टरने केदारनाथ गाठले होते. तेथे त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या दरम्यान त्यांनी केदारनाथ मंदिरातील भक्तांशी देखील संवाद साधला. मात्र या राहुल गांधीच्या या केदारनाथच्या भेटी नंतर भारतीय जनता पार्टीने टीका केली आहे. भाजपाचे राज्य माध्यम प्रभारी मनवीर सिंग चौहान म्हणाले की,राहुल गांधींचे सनातन धर्माविषयीचे प्रेम दिसून येत आहे.राजकीय फायद्यासाठी ते हा दौरा करत आहेत.केदारनाथ भेटीमुळे राहुल गांधींना सद्बुद्धी मिळेल. या दरम्यान रविवारी रात्री राहुल गांधींनी केदारनाथ मंदिरातील भक्तांशी संवाद साधला. तसंच, त्यांना चहाचंही वाटप केलं. भक्तांना चहाचं वाटप केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं कौतुक केलंय.(People likes Rahul Gandhi’s This Action )त्यांची हीच कृतीने अनेकांची मने जिंकली असून ती अनेकांना भावली आहे.यानंतर राहुल गांधी यांनी एक्स वर एक पोस्ट टाकली आहे.त्यामध्ये त्यांनी महादेवाचे दर्शन घतल्याचे म्हणत भावीकांना चहा वाटपाचं काम करण्याचं सौभाग्य लाभल्याचे म्हणटंले आहे.

Latest Posts

Don't Miss