Saturday, January 11, 2025

Latest Posts

मी भाजपात आहे, पण माझं मन काँग्रेसमध्ये

राहुल गांधींनी भर सभेत सांगितला भाजपच्या त्या खासदाराचा किस्सा

Rahul Gandhi Nagpur News : नागपुरात काँग्रेसचा 139 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्यदिव्य सभा गुरुवारी पार पडली. महाराष्ट्राचे सर्व काँग्रेसचे दिग्गज नेते या सभेत सहभागी झाले. तसेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी राहुल गांधी यांचे तूफानी भाषण केले. यावेळी त्यांनी भर सभेत मोठा गौप्यस्फोट केला.त्यांनी भाजपात असलेल्या खासदारांची कशी अवस्था आहे यावर भाष्य केले.

काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या एक खासदार आपल्याला संसदेत चोरुन भेटला. (Rahul Gandhi tells story about Bjp mp in Nagpur congress foundation day) त्यावेळी त्याने आपल्या मनाची झालेल्या अनावस्थाविषयी भावना व्यक्त केली, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये लोकप्रतिनिधींना मोकळेपणा आणि स्वातंत्र्य आहे, पण भाजपात तसं नाही. तिथे वरिष्ठांचा जो आदेश येतो त्याचं पालन करावं लागतं, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

ते म्हणाले “काही दिवसांपूर्वी भाजपचा एका खासदार मला लोकसभेत भेटला, अनेक भाजप खासदार आधी काँग्रेस पक्षात होते तसा हा देखील काँग्रेस पक्षात होता. मला चोरुन भेटला. मला लांबून पाहिलं, लपून, भीतीने म्हणतो, राहुलजी आपल्यासोबत बातचित करायची आहे. मी म्हटलं, काय बोलायचं आहे, तुम्ही तर भाजपात आहात? त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसत होतं. मी विचारलं, सर्व ठीक आहे ना? तर म्हणाला, नाही. काय झालं? तर तो म्हणाला, राहुलजी भाजपमध्ये राहून सहन होत नाही. मी भाजपात आहे, पण माझं मन काँग्रेसमध्ये आहे.  मी म्हटलं की, तुझं मन काँग्रेसमध्ये आणि शरीर भाजपात आहे. याचा अर्थ मन शरीराला काँग्रेसमध्ये आणण्यासाठी घाबरत आहे”, असं राहुल गांधी भाषणात म्हणाले.

नाना पटोले आऊट झाले

यावर बोलताना राहुल गांधी यांनी नाना पटोलेचे एक उदाहरण दिले. ते म्हणाले जसं आधी राजा आदेश द्यायचे, तसं भाजपात वरिष्ठांकडून आदेश येतात आणि त्याचं पालन करावं लागतं. आपल्याला त्याचं पालन केल्याशिवाय पर्याय नसतो. आमचे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांबद्दल एक प्रश्न विचारला होता, जीएसटी तुम्ही जो लावला त्यामध्ये शेतकऱ्यांचा काय वाटा असेल? मोदीजींना प्रश्न आवडला नाही. पटोले आऊट झाले. त्यांची विचारधारा राजेशाहीची विचारधारा आहे. कुणाचं ऐकायचं नाही. आदेश वरिष्ठांकडून येणार आणि आपल्याला त्याचं पालन करावं लागेल”, असा दावा राहुल गांधींनी केला.

 

Latest Posts

Don't Miss