Saturday, January 11, 2025

Latest Posts

विचारांची लढाई सुरूच राहील : Rahul Gandhi

Rahul Gandhi On Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाच्या यशामुळे सत्तांतर होण्याची तर मध्य प्रदेशात भाजपा सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. भाजपा या तिन्ही राज्यांत सत्ता स्थापनेचा मार्ग स्पष्ट झाला आहे.तेलंगणात बीआरएसचा धोबीपछाड करत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राजकीय सध्यस्थितीवरून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.(Rahul Gandhi Statement on Election Result)

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात भाजपाने अभूतपूर्व मुसंडी मारली आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाने सत्तांतर घडवून आणले असून मध्य प्रदेशातील दोन दशकाची सत्ता कायम ठेवली आहे. चारपैकी तीन राज्यांत भाजपाने सत्ता मिळवली आहे.तर तेलंगणामध्ये काँग्रेसने दणक्यात एन्ट्री केली आहे.यावरून राहुल गांधी यांनी पोस्ट केली आहे.मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रतेने स्वीकारत आहोत. विचारांची लढाई सुरूच राहील”, असं राहुल गांधींनी अपयश स्वीकारत म्हटलं आहे. तर, तेलंगणाच्या लोकांचे मनापासून आभार. लोकांचं तेलंगणा बनवण्याचा आमचा प्रयत्न असाच सुरू राहील. सर्वन कार्यकर्ते आणि त्यांच्या मेहनत आणि समर्थनासाठी मनपूर्वक आभार असं राहुल गांधी म्हणाले.

Latest Posts

Don't Miss