| TOR News Network | Lok Sabha Elections 2024 : पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यावर स्तुती सुमनं उधळली. त्याचे लागलीच पडसाद भारतात दिसून आले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी हे पाकिस्तानमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. ते पाकिस्तानमधून सहज निवडणूक जिंकू शकतात, (Rahul gandhi can win from pakistan) पण भारतातून नाही, असा चिमटा सरमा यांनी काढला. (Hemant Biswa Sarma’s Statement)
पाकिस्तानमध्ये राहुल गांधी सर्वाधिक लोकप्रिय आहेत. पाकिस्तानमध्ये जर निवडणुका झाल्या. तिथे राहुल गांधी उमेदवार म्हणून उभे राहिले. तर ते बहुमताने तिथून निवडून येतील. पाकिस्तानमध्ये राहुल गांधीविरोधात आम्ही जिंकू शकत नाही. पाकिस्तानमध्ये राहुल गांधी यांचा नक्की विजय होईल.(From pakistan rahul gandhi will definately win) राहुल भारतात तर निवडणूक जिंकू शकत नाही, (Rahul gandhi will not win from india)पण ते पाकिस्तानमध्ये नक्कीच निवडून येऊ शकतात. भारतात तर केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असतील, असे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले. (Narendra modi will be pm again)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण राहुल गांधींवर नाव न घेता हल्लाबोल केला होता. आणंदमधील सभेत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला होता.(Modi on rahul gandhi) आज काँग्रेस कमजोर होत असताना, ती मरणासन्न होत असताना पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेससाठी आता पाकिस्तानचे नेते प्रार्थना करत आहेत. शहजादेला पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ झाला आहे. अशी जहरी टीका मोदींनी केली होती.
पाकिस्तानचे पूर्वमंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधी यांचे कौतुक केले. (Chaudhary Fawad Hussain on Rahul Gandhi)त्यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ पण शेअर केला. त्यात कॅप्शन लिहिले होते, “राहुल गांधी ऑन फायर.” या व्हिडिओमध्ये ते राम मंदिराच्या विषयात बोलताना, प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात गरीबांना आमंत्रित करण्यात आले होते का? असा सवाल विचारताना दिसत आहेत. हुसैन यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल यांचे कौतुक केले होते.