Saturday, January 11, 2025

Latest Posts

आता भारत जोडो नाही तर भारत न्याय यात्रा काढणार राहुल गांधी 

मणिपूर ते मुंबई असा ६ हजार २०० किलोमीटरचा करणार प्रवास

Rahul Gandhi Latest News On Bharat Nyay Yatra : कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा यशस्वी झाल्यानंतर आता राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील यात्रा सुरू होणार आहे. मणिपूर ते मुंबई अशी ही पदयात्रा असणार असून भारत न्याय यात्रा असं याचं नाव आहे. (Now Rahul Gandhi Will Take A Bharat Nyay Yatra) (Nyay Yatra in Maharashtra) काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. (Bharat jodo is now bharat Nyay yatra) त्यामुळे आता परत महाराष्ट्रातील जनतेला राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होऊन ती अनुभवायला मिळणार आहे.

राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेत १४ राज्यांमधील तब्बल ८५ जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. हा मोर्चा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात असा ६ हजार २०० किलोमीटरचा प्रवास करेल. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे १४ जानेवारीला मणिपूरमधून या यात्रेला सुरुवात करतील. भारत जोडो यात्रेने ४ हजार ५०० किलोमीटर प्रवास केला होता.या यात्रेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा याकरता बसची सुविधा करण्यात आली आहे. तसंच, पायी पदयात्राही होणार आहे. दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या आणि उत्तरेकडील काश्मीरमध्ये संपलेल्या भारत जोडो यात्रेला त्यांनी “ऐतिहासिक यात्रा” म्हटलं आहे. भारत जोडो यात्रेतून अनुभव घेत राहुल गांधी आता तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणार आहेत, असं केसी वेणुगोपाल म्हणाले.

Latest Posts

Don't Miss