Monday, January 13, 2025

Latest Posts

पोर्शे कार अपघातप्रकरणी आमदार सुनील टिंगरेंची तब्बल चार तास चौकशी

| TOR News Network |

Pune Porsche Accident Latest News : पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी आमदार सुनील टिंगरेंची तब्बल चार तास चौकशी केल्याची माहिती समोर आले आहे.(Mla Sunil Tingre interrogation by police) आता या माहितीला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजेरा दिला आहे. मात्र, नेमक चौकशीत काय काय झालं, आमदार महोदयांनी काय सांगितले हे गुलदस्त्यात आहे.  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अंगाशी हे प्रकरण आलेले असताना ही चौकशी इतकी गुपित का ठेवली गेली,(Cp Amitesh kumar in pune car accident) असादेखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री पबमधील पार्टीनंतर मद्याच्या नशेत आलिशान कार चालवून बिल्डर विशाल अगरवाल यांच्या पुत्र असलेल्या अल्पवयीन मुलाने दोन आयटी इंजिनिअर तरुण-तरुणीचा दुचाकीला धडक देऊन भीषण अपघात झाला होता. (Pune car accident vishal agrawal)या अपघातात अनिश अवधीया आणि अश्विनी कोष्ट याचा मृत्यू झाला होता. मात्र, अपघातानंतर बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न झाले.

स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनीदेखील यासाठी प्रयत्न केले, असा आरोप झाला. (Mla Tingre in Pune car accident matter)आमदार मध्यरात्री येरवडा पोलीस ठाण्यातदेखील हजर होते. त्यांनी मुलाला वाचवण्यास पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला व त्यांना फोन केले, (tingre Pressure on police to save the child) असा आरोप करण्यात येत होता. तसेच, ससूनमधील डॉक्टर यांना फोन केले, असेही सांगितले जात होते.

यामुळे शहरासह जिल्ह्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. दुसरीकडे गुन्हा दाखल होण्यास झालेला उशीर, किरकोळ कलम आणि मुलाची उशिरा झालेली मद्य चाचणी, यामुळे पुणे पोलिसांवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. (Question on police inquiry) त्यात मुलांना पोलीस ठाण्यात पिझ्झा पार्टी यावरूनही गदारोळ झाला होता. त्यात अल्पवयीन मुलाला अवघ्या १५ तासात जामीन मिळाला. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चिंगळले आणि पोलिसांच्या गळ्याशी आले.

पोलिसांच्या गळ्याशी प्रकरण आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालय येऊन याची माहिती घेत माध्यमाशी सवांद साधला होता.(HM Devendra FAdnavis On Pune Accident) त्यांनी पुणे पोलिसांनी चांगले काम केले, असे म्हटले. यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वेळोवेळी घटनेची माहिती उघड केली.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे रविवारी एका कार्यक्रमात आले होते. ते बोलत असताना त्यांनी सुनील टिंगरे यांची चौकशी झाल्याचे जाहीररित्या सांगितले.(DCM Ajit Pawar On Tingre inquiry) मात्र पुणे पोलिसांकडून चौकशीबाबत गुप्तता पाळली. तसेच आमदार महोदयांच्या चौकशीतून नेमके काय निष्पन्न झाले हे देखील स्पष्ट होत नाही. त्यामुळे पुणे पोलीस नेमकं काय लपवत आहेत असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Latest Posts

Don't Miss