Saturday, January 11, 2025

Latest Posts

पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने दोन जीव वाचवले

Pune Metro Rail Guard Saved Two Life : पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक (Vikas Bangar) विकास बांगर याने प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २:२२ मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक २ वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळतांना रुळावर पडला. त्यावेळी कामावर असणाऱ्या सुरक्षारक्षकाने मुलाला ट्रॅक वर पडताना पहिले. पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळांवर पडली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षारक्षक विकास बांगर याने फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर (ई.एस.पी) बटन वेळीच दाबले. त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप रित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले व परिवाराशी त्याची भेट करून देण्यात आली.

vikas bangar pune meetro rail

सुरक्षारक्षक श्री. विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (प्रशासन व जनसंपर्क), महाव्यवस्थापक सोमेश शर्मा (वित्त) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी स्थानक नियंत्रक व पुणे मेट्रोचे कर्मचारी उपस्थित होते.

विडिओ बघा : विकास बांगर ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवताने 

 

Latest Posts

Don't Miss