Saturday, January 11, 2025

Latest Posts

भाजपच्या आमदारांचं ठरलं ; पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही

| TOR News Network |

Ajit Pawar Latest News :  आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा महायुतीकडून करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीमधील घटक पक्षांमध्ये वाद आहे. हे वाद सोडवणे वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. आता पुणे येथील भाजप आमदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात ठराव केला आहे.(Bjp Mla against ajit pawar Ncp in pune) राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार न करण्याचा ठराव पक्षाच्या बैठकीत आमदारांनी केला आहे. (Bjp will not work for ajit pawar ncp)

पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करायचा नाही, असा ठराव भाजपने केला आहे. आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे, भाजप नेते सदाशिव खाडे, भाजप प्रवक्ते राजू दुर्गे यांनी पक्षाच्या बैठकीत हा ठराव समंत केला आहे. या सर्वांचा आमदार अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत कमळाचा उमेदवार मिळाला नाही, आता आम्हाला कमळाचाच उमेदवार हवा आहे, अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली. (Bjp candidate will contest election from pune)

भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.(Bjp mla meeting in pune) या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला. लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा प्रचार केला नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी बैठकीत केला. अजित पवार यांच्या पक्षाकडून युतीचा धर्म पाळण्यात नाही, मग आपण घड्याळाचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

Latest Posts

Don't Miss