Saturday, January 11, 2025

Latest Posts

केशव-माधव न्यासच्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरीत

| TOR News Network | पुणे. (Prize Distribution To Winners Of Keshav-Madhav Nyas Competition) केशव-माधव न्यासतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर कर्वेनगर येथील ज्ञानदा शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. ज्ञानदा संस्थेच्या सभागृहात हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर संघचालक उदयन पाठक हे प्रमुख पाहुणे होते. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तक व शिव प्रतिमा देण्यात आली.

केशव माधव न्यासचे सचिव अरविंद देशपांडे, विश्वस्त प्रकाश देशपांडे, नाट्यकर्मी कुलदीप धुमाळे, नितीन मुजुमदार, मोहन मोने यांची व्यासपीठावर मुख्य उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस नाट्यकर्मी कुलदीप धुमाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांवरील कार्याची गौरवपर गीते गाऊन घेतली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व विषद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी यांनी केले. आभार केशव-माधव न्यासाचे सचिव अरविंद देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे कार्यवाह मंदार शेंडे, मीना पानसरे, जगदीश वाघ, सुनीता भोसले, दिनेशकुमार जगताप यांनी परिश्रम घेतले.

ज्ञानदा शाळेतील इयत्ता आठवी व नववी वर्गातील मुलामुलींनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये तन्वी कोळी (प्रथम), ऋतुजा पवार (द्वितीय), आर्या कवठेकर (तृतीय), अक्षरा कांबळे,  अरुणा शितोळे, प्रगती हळब, रुद्र सातपुते, आर्यन जाधव, भावेश पाटील, अभिजित मोरे, संध्या पवळे, प्रिया वाहुळे, तनिष्क कवदे, सार्थक भुवड, साईराज शिंदे यांचा समावेश आहे.

Latest Posts

Don't Miss