Saturday, January 18, 2025

Latest Posts

प्रतिमा बोंडेला सुवर्ण पदक

| TOR News Network | नागपूर. | Pratima Bonde Got Gold Medal In Khasdar Krida Mahotsav | नागपूर शहरात नुकतेच पार पडलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये दिव्यांगांच्या पॉवरलिफ्टिंग (Powerlifting) स्पर्धेत प्रतिमा बोंडेने उत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली.

12 ते 28 जानेवारी दरम्यान नागपूर शहरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सव पार पडला. या महोत्सवात एकूण 56 प्रकारच्या विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. 18 ते 20 जानेवारीदरम्यान ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानामध्ये दिव्यांगांच्या (Divyang) स्पर्धा घेण्यात आल्या. यात पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतिमा बोंडेने 50 किलो वजनगटात बाजी मारली. प्रतिमाने 80 किलो वजन उचलून पहिले स्थान प्राप्त केले.

या यशाबद्दल आमदार मोहन मते तसेच प्रतिमाचे प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू विजय मुनीश्वर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

Latest Posts

Don't Miss