Saturday, January 11, 2025

Latest Posts

संजय राऊत हे मीडियाला खोटं सांगतात

| TOR News Network | Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi : “महाविकास आघाडीच जागा वाटप होत नाहीय. याच कारण वंचित बहुजन आघाडी नाहीय. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत 10 जागांवरुन मतभेद आहेत. या 10 जागा काँग्रेस मागतय, उद्धव ठाकरे यांनाही त्या जागा हव्या आहेत. अनके राऊंडची चर्चा त्यांच्यामध्ये झाली. पण ते ऐकमेकांना सीट सोडायला तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “दुसरा भाग असा आहे की, पाच जागा अशा आहेत की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेअरींगमध्ये होत नाहीय. एकही जण दावा सोडायला तयार नाहीय. म्हणून त्यांचा समझोता होत नाहीय” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.(Dispute With Congress And Shivsena on Seat Allocation)

“संजय राऊत हे मीडियाला खोट सांगतात.(Sanjay Raut lies to the media) भांडणं मिटलेली नसताना एकत्र जाणार की, मैत्रीपूर्ण लढणार? याचा निकाल लावलेला नाही” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.( Vanchit Bahujan Aghadi Chief Ambedkar) “आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आधी तुमचं मिटवा. महाविकास आघाडीच चर्चेच घोंगड भिजत असलं, तरी काँग्रेस आणि वंचितमधील समझोता पुढे घेऊन जाऊ, यासाठी रमेश चैनीथला यांच्याशी चर्चा केली. पण त्यांच्याकडून दुजोरा मिळाला नाही, म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिलं. समझोता पुढे नेण्यासाठी हे पत्र होतं. पण अजून उत्तर आलं नाही अशी एकंदर परिस्थिती आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 तर त्यांनी 10 जागांसंदर्भात बोलावे

“मोदींची सत्ता घालवणं की पक्ष वाढवणं? काँग्रेसची प्राथमिकता काय?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत राहतील का? हा मुद्दादेखील त्यांनी मांडला. “नवनीत राणा यांनी जेलमध्ये जाण्याची मानसिक तयारी केली पाहिजे. त्यांनी फ्रॉड केला आहे. संजय राऊत म्हणतात समझोता झाला आहे, तर त्यांनी 10 जागांसंदर्भात बोलावे.(Seat Sharing For Loksabha Election 2024) आम्ही महाविकास आघाडी सोबत बसलो आहोत, संजय राऊत यांच्या सोबत नाही” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. (Prakash Raut Slams Sanjay raut)

Latest Posts

Don't Miss