Saturday, January 11, 2025

Latest Posts

17 रूपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही : त्यांचे डिपॉझिट आम्ही जप्त करणार

| TOR News Network | Bacchu Kadu Latest Statement : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. आमदार बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. (We will not campaign for rana) त्यासाठी वेळप्रसंगी महायुतीतून बाहेर पडू पण नवनीत राणांसाठी मत मागणार नाही.तसेच त्यांनी महायुतीला धक्का देत प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केली. (Dinesh Bub from amravati lok sabha) आता या सर्व प्रकरणात नवनीत राणांवर घणाघाती हल्ले ते करत आहेत. (Bacchu kadu amravati news )

17 रुपयांची साडी 2 कोटींची गाडी

प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जत केली गेली. (17 rupees saree disappoint melghat women)आपण 2 कोटींच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची. परंतु ही 17 रूपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही, असा खरपूस समाचार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचा घेतला. राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. नवनीत राणाचा डिपॉझिट आम्ही जप्त करणार आहोत.(We will confiscate Rana’s deposit)

महायुतीचे लोक मदत करतील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर कुणीही नाराज नाही, असे म्हटले आहे. (Chandrashekhar Bawankule on rana) आमचे कार्यकर्ते काहीही बोलले नाहीत. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील. महायुतीचे लोक मदत करतील. महायुतीचे उमेदवार 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. त्यांचे जात प्रमाणापत्र बरोबर आहे. कोर्टाच्या निकालात ते स्पष्ट होईल.

ऐकले नाही तर मतदार निर्णय घेतली

बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतच्या युतीत आहेत. शिंदेमार्फत त्यांचा भाजपशी संबंध आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बच्चू कडूचा तिढा सोडवा, अशी विनंती करणार आहोत. त्यानंतरही बच्चू कडू यांनी ऐकले नाही तर मतदार निर्णय घेतली.

Latest Posts

Don't Miss