Sunday, January 12, 2025

Latest Posts

फडणवीसांना पराभूत करण्यासाठी प्रफुल्ल गुडधेंकडून प्रचारात चारपट खर्च

| TOR News Network |

Devendra Fadnavis Latest News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीत सगळेच प्रमुख पक्ष घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. (All eye on fadnavis constituency) या मतदारसंघात फडणीवस जिंकणार का? जिंकले तर त्यांना किती मताधिक्य मिळेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी नागपूरमध्ये महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) चांगलाच जोर लावला आहे. त्याचीच प्रचिती आता आली आहे. उमेदवारी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात नेमका किती खर्च केला हे समोर आले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी फडणवीसांच्या (Devendra Fadnavis vs prafull gudade patil)  तुलनेत चार पट खर्च केला आहे.

या विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात नेमका किती खर्च केला, याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोणी किती खर्च केला, हे समोर आले आहे. या माहितीनुसार नागपूर शहरात आतापर्यंत निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी 64 हजार 136 रुपये खर्च केले आहेत. तर त्यांचे प्रतिद्वंदी प्रफुल्ल गुडधे यांनी आतापर्यंत 2 लाख 99 हजार 581 रुपये प्रचारात खर्च केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण चार पटीपेक्षाही जास्त होते.

दुसरीकडे निवडणूक खर्चात दक्षिण नागपूरचे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव नागपुरात सर्वात आघाडीवर आहेत. (Girish Pandav Latest News) पांडव यांनी प्रचारावर आतापर्यंत 6 लाख 56 हजार 675 रुपये खर्च केले आहेत. उत्तर नागपूरमधील भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांनी 4 लाख 17 हजार 617 तर मध्य नागपुरातील प्रवीण दटके यांनी 3 लाख 56  हजार 98 रुपये खर्च केले आहेत.(Pravin datke latest news) नागपूर शहरातील सहा मतदारसंघात सर्वात कमी खर्च मध्य नागपुरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी केला आहे. त्यांनी प्रचारासाठी आतापर्यंत 44 हजार 243 रुपये खर्च केले आहेत.

Latest Posts

Don't Miss