| TOR News Network | Ashok Chavan Latest News : राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षाला राम राम ठोकला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. आता ते भाजपात प्रवेश घेणार आशी चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे. मात्र आपण लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पुढे लोकसभेच्या निवडणूका लागत आहे.अशात मराठवड्यातील पक्षाच्या दिग्गज नेत्याला येवढा मोठा निर्णय का घ्यावा लागला याची काय कारणे असू शकतात आपण जाणून घेणार आहोत.(Reason why ashok chavan left congress)
निवडणुका तोंडावर आल्या असताना मोठ्या नेत्यानेच पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Chavan Big Shock To Congress)अशोक चव्हाणांच्या जाण्यामागची कारणांचा जर विचार केला तर भाऊराव चव्हाण साखर कारखान्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेकडून 200 कोटींचे कर्ज घेतले होते. त्या प्रकरणाची कारखान्याची कुटुंबियांची ईडी चौकशी होणार असल्याच्याही चर्चा होणार असल्याची चर्चा होत होती.(Ashok chavan on ed target) त्यासोबतच भाजपने काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचा तपास अद्याप सुरू असल्याचं म्हटलं आहे.
आदर्श घोटाळ्याचा तपास सुरू असल्याचं श्वेतपत्रिकेमध्ये सांगितल्याने अशोक चव्हाणांच्या समोरील अडचणी वाढल्या असत्या. त्यामुळे चव्हाणांनी काँग्रेसला राम राम केल्याची चर्चा होत आहे. तर नांदेडमधून भाजपासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून आपली निवड होऊ शकते, असं समर्थकांचं मत असल्याचं बोलं जात आहे. काँग्रेसमधाल अंतर्गत गटबाजीने चव्हाण नाराज असल्याची चर्चा आहे. (Chavan upset with the internal factionalism in Congress)
अशोक चव्हाण आऊट ऑफ कव्हरेज एरिया
आज प्रवेशाची शक्यता
अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. मंगळवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (Ashok chavan to join BJP Today) त्यांच्यासोबत काँग्रेसचे १० ते १२ आमदार देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण
जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम केलं, आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, अशा भावनेतून मी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षातील कोणत्याही आमदारासोबत माझी काही चर्चा झालेली नाही. राजकीय निर्णय पुढच्या दोन- ते तीन दिवसात घेईल, असं अशोक चव्हाण यांनी मीडियासोबत बोलताना सांगितलं.दरम्यान, अशोक चव्हाण हे येत्या 15 फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. अशोक चव्हाणांनी यावर बोलताना अदयाप कोणताही निर्णय घेतला नाही असं म्हटलं होतं.