Thursday, January 16, 2025

Latest Posts

विधानपरिषदेत विरोधकांच्या संपर्कात असलेल्या आमदारांनकडून क्रॉस वोटिंगची शक्यता

| TOR News Network |

Vidhan Parishad Election News : लोकसभेचा निकाल महायुतीच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच आता अजित पवार गट विरोधात भाजप असा अंतर्गत समाना रंगला आहे.तर महाविकास आघाडीत पण मोठा भाऊ कोण? यावरुन शीतयुद्ध सुरु आहे.(Cold war in mahavikas aghadi) ही घटना पहाता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका होत असून (Vidhan Parishad election 2024) त्यात आता क्रॉस वोटिंगची भीती वाढली आहे.(Cross voting Fear in vidhan parishad)

या विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंगची शक्यता व्यक्त होत आहे.(Possibility of cross voting) लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीमुळे महायुतीमध्ये निराशेचे वातावरण आहे. तर आता पराभवाचे खापर एकमेकांवर पण फोडण्यात येत आहे. त्यातच या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्यामुळे कुंपणावर (विरोधकांच्या संपर्कात) असलेले आमदार हे क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

12 जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या (12 july vidhan parishad Election) 11 जागेच्या निवडणुकीदरम्यान राज्यात पुन्हा एकदा आमदारांसाठी हॉटेल पॉलिटिक्स होऊ शकते. (Vidhan parishad elections for 11 seats) 11 जागेच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मतांची गोळा बेरीज करण्यासाठी रस्सीखेस पाहायला मिळणार आहे.

सध्या विधानसभेचे संख्याबळ 274 आहे. त्यामुळे भाजपा आमदारांच्या संख्याबळानुसार 5 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित दादा प्रत्येकी दोन-दोन विधान परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात. काँग्रेस पक्षाची 1 जागा सहज निवडून येऊ शकते. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे संयुक्त म्हणून एक जागा निवडून येऊ शकते. मात्र मतांची गोळा बेरीज करून महाविकास आघाडी मधील काही नेतेमंडळी यापेक्षा वेगळं, समीकरण करण्याचा नक्की प्रयत्न करतील.या निवडणुकीत संभाव्य गणित पाहून आणखी ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Latest Posts

Don't Miss