Friday, January 17, 2025

Latest Posts

मानेवाडा चौकात ‘पौर्णिमा दिवस’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद



| TOR News Network | |Poornima Day Campaign at Manewada Chowk| नागपूरनागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या पौर्णिमा दिवस अभियानाला सोमवारी (ता.२६) रात्री मानेवाडा चौकातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानामध्ये ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसवेकांना जनजागृतीसाठी स्थानिक नागरिकांची देखील साथ मिळाली.

पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत सोमवारी (ता.२६) मानेवाडा चौक येथे जनजागृती करण्यात आली. ग्रीन व्हिजिलचे कौस्तभ चैटर्जी, सुरभी जैसवाल, मेहुल कोसूरकर, शीतल चौधरी, विष्णु देव यादव, श्रीया जोगे, प्रिया यादव, पार्थ जुमडे, तुषार देशमुख, संस्कार माहेश्वरी, मिताली पांडे या स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.

POORNIMA DAY

मनपाचे प्रकाश रुद्राकर, शेखर पवार, मोहन कोहलेकर, अमोल कोहळे यांच्यासह भोलानाथ सहारे, मधुकर राव पाठक, प्रणिता लोखंडे, मनोज भालेराव, पप्पू वासवानी, उज्ज्वला टोपरे, कविता टोपरे, शर्मिला बादगे, अपूर्व दे, राजा भंडककर, श्रीकांत क्षीरसागर, किशोर भागते, महादेवराव अंजनकर, संगीता लेंडे आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

Latest Posts

Don't Miss