Saturday, January 11, 2025

Latest Posts

शिवरायांचा पुतळ्यावरून राजकारण तापलं : संभाजीराजे,सुळे, राऊतांनी सरकारला घेरले

| TOR News Network |

Shivaji Maharaj Statue Collapse News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. (The political atmosphere heated up ) अवघ्या वर्षभरापूर्वीच नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण हा पुतळा अचानक कोसळल्याने राज्यभरातून त्याची तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. यावर संभाजीराजे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत,खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाना साधला आहे.

4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. पण उद्धाटनानंतर आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा कोसळला. काल झालेल्या या घटनेनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.( opposition Aggressive stance on Shivaji Maharaj Statue Collapse ) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय.(Sanjay Raut On Shivaji Maharaj Statue Collapse) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असून उद्धव ठाकरे  यांच्या पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचीच तोडफोड केल्याचे समोर आले आहे. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील कॉन्ट्रॅक्टर हा ठाणे जिल्ह्यातला असल्याचे सांगत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच बोट दाखवले आहे.(Supriya sule On Shivaji Maharaj Statue Collapse)

संभाजीराजेंनी तेव्हाच लिहले होते पत्र
पुतळ्याच्या अनावरणानंतर लगेचच संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधनांना एक पत्र लिहित या पुतळ्यातील काही उणिवा समोर आणल्या होत्या. सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी ज्यावेळी हा पुतळा कोसळला तेव्हा मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी उद्विग्न प्रतिक्रिया देत पंतप्रधनांना लिहिलेलं ते पत्र जाहीर केलं. (Sambhaji Raje Letter to PM) सिंधुदुर्गातील राजकोट येथे उभारण्यात आलेला हा पुतळा उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. या पुतळ्याची/ शिल्पाची घडण प्रभावी आणि रेखीव नसल्याचं म्हणत त्याचं काम अतिशय घाईगडबडीत केल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मूर्तीतील अनेक बारकाव्यांविषयीसुद्धा या पत्रातून संभाजीराजेंनी भाष्य केलं होतं.

दोन व्यक्तींविरोधात FIR  दाखल
पण अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणात दोन व्यक्तींविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे.(Fir Loged on 2 person) ठेकेदार आणि आर्टिसरी कंपनीचे मालक जयदीप आपटे तसच स्ट्रक्चरल कंसल्टेंट डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. जयदीप आपटे कल्याण येथे राहतात तर डॉक्टर चेतन पाटील कोल्हापुर येथे राहतात. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत 109, 110, 125 आणि 318 (3) (5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणात सहाय्यक इंजीनियर आणि पीडब्ल्यूडी अधिकारी अजित पाटिल यांनी सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Latest Posts

Don't Miss