| TOR News Network | Indias First Underwater Metro : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथील देशातील पहिल्या पाण्याखालतून धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन होणार आहे.लोकसभेची निवडणूक तोंडावर असून १० मार्चनंतर केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदी सध्या विकास कामांच्या उद्घाटनात व्यस्त आहेत.(Pm Modi To Inaugurate under Water Metro Today in Kolkata)
तीन स्थानके असतील भूमिगत
पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे देशातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो विभागाचे उद्घाटन करणार आहेत.(Kolkata Under Water Metro) पाण्याखालील मेट्रो बोगदा हा हुगळी नदीच्या खाली 16.6 किलोमीटर पसरलेला अभियांत्रिकीचा मोठा प्रकल्प आहे. अंडरवॉटर मेट्रो हुगळीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेक शहराला जोडेल. यात 6 स्थानके असतील, त्यापैकी तीन भूमिगत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्यांना पाण्याखालील मेट्रोचा आनंद घेता येणार आहे.
10.8 किमी भाग भूमिगत मार्ग
या मेट्रोचे वैशिष्ट म्हणजे यात 10.8 किमी भाग भूमिगत आहे. हा भारतातील अशा प्रकारचा पहिला वाहतूक प्रकल्प आहे, ज्यामध्ये मेट्रो रेल्वे नदीखाली बांधलेल्या बोगद्यामधून जाणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या मेट्रो रेल्वे सेवांचा आढावा घेतला घेत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली होती.
मेट्रो कॉरिडॉरसाठी नदीखाली बोगदा
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, कोलकाता मेट्रोचे काम 1970 च्या दशकात सुरू झाले होते, परंतु मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षात झालेली प्रगती मागील 40 वर्षांपेक्षा खूप जास्त आहे.(Modi Has fast Working Style) ते म्हणाले की, पंतप्रधानांचे लक्ष पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आणि देशाचा पाया रचण्यावर आहे, जे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र असेल. कोलकाता मेट्रोचे काम अनेक टप्प्यांत पुढे गेले. सध्याच्या टप्प्यात शहरातील पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरसाठी नदीखाली बोगदा बांधण्यात आला आहे.