Saturday, January 11, 2025

Latest Posts

श्री राम, जय राम…’, च्या जयघोषात मोदींचे अयोध्यानगरीत दणक्यात स्वागत…आज करणार..

PM Modi in Ayodhya : राम मंदिराच्या प्रतिष्ठापने आधीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, (30 डिसेंबर) अयोध्येच्या एकदिवसीय दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधानांचे अयोध्येत आगमण झाले आहे. ‘श्री राम, जय राम…’, च्या जयघोषात अयोध्या नगरीत PM मोदी यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे. (PM Narendra Modi Road Show) या दौऱ्यात अयोध्या धाम रेल्वे स्टेशन (Ayodhya Dham) आणि अयोध्या एअरपोर्टचे (Ayodhya Airport) उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात अयोध्येला सुमारे 15 हजार 700 कोटी रुपयांच्या योजनांची भेट देणार आहेत. तसेच देशाला 6 वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. त्यात महाराष्ट्रातील एका वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. तर 2 अमृत भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत भव्य स्वागत केले जात आहे. रोड शोदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला जनसागर लोटला आहे. मोदींच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी केली जात आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.पंतप्रधान मोदी रोड शो नंतर जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. शुक्रवार रात्रीपासून शनिवार रात्रीपर्यंत लखनऊकडून अयोध्येत येणाऱ्या मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अयोध्येतील महर्षि वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्टचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पायलट इन कमांड कॅप्टन आशुतोष शेखर हे आज पहिले कमर्शियल फ्लाईट लॅंड करणार आहेत.

अखेर त्यांना मिळाले निमंत्रण

उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रणशिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर आयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आरपीआय पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांना कुरिअरद्वारे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आल्याचे समजते.

Latest Posts

Don't Miss