Saturday, January 11, 2025

Latest Posts

क्रीडा पुरस्काराच्या नियमात बदल,खेळाडूंमध्ये संताप

Chhatrapati Sports Award News : क्रीडा नैपुण्याने महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून, यातून आतापर्यंत समाविष्ट असलेल्या सहा क्रीडाप्रकारांना वगळण्यात आले आहे. (Sports fraternity angry on rule change for shree chhatrapati sports award) यात कॅरम, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग), बिलियर्ड्स-स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ आणि यॉटिंग या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. राज्य क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाबाबत क्रीडाक्षेत्रातून संतापाची लाट उसळली आहे.

शासनाने नव्याने जाहीर केलेल्या पुरस्कार नियमावलीनुसार, वगळण्यात आलेल्या खेळासंदर्भात ऑलिम्पिक प्रकार नसल्याचा किंवा राज्यात त्या खेळाचा प्रसार नसल्याची कारणे देण्यात आली आहेत. त्याच बरोबर वगळण्यात आलेल्या खेळांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) मान्यता नसल्याचेही समोर आले आहे. शासनाने दिलेली कारणे हा पूर्णपणे लालफितीचा कारभार असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत या प्रत्येक खेळातील खेळाडूला शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात येत होते.

क्रीडा नैपुण्याने महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून, यातून आतापर्यंत समाविष्ट असलेल्या सहा क्रीडाप्रकारांना वगळण्यात आले आहे. यात कॅरम, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग), बिलियर्ड्स-स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ आणि यॉटिंग या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. राज्य क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाबाबत क्रीडाक्षेत्रातून संतापाची लाट उसळली आहे.

Don't Miss