Sunday, November 17, 2024

Latest Posts

उमेदवार म्हणाला… लोक मला नोट आणि व्होटही देताहेत

| TOR News Network | Nilesh Lanke Statement : संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीकडून निलेश लंके तर महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. (Nilesh Lanke vs Sujay vikhe Patil) हे दोन्ही उमेदवार एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत.अशात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक विधान केले आहे.(Nilesh lanke note And vote statement) त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. लंके म्हणालेत लोक मला नोटही देतात आणि व्होटही देताहेत. यावेळी त्यांनी खिशातून पैसे काढून दाखवत कुणी, किती रुपये दिले,याचीही माहिती दिली. (Lanke said people are giving me vote and note)

निलेश लंके अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात असणाऱ्या लंकेंनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला होता.(Nilesh lanke in sharad pawar ncp) त्यानंतर त्यांना संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली.(Nilesh Lanke from sambhaji nagar)

निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर लंकेंनी केलेलं हे वक्तव्य आता चांगलंच चर्चेत आलं आहे. एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले १०० रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने कष्टाने कमवलेले ५०० रुपये निवडणुकीसाठी मला मदत दिली, . संभाजीनगरच्या माहीजळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा गेली होती.(Swabhiman Jansamvad Yatra) त्यावेळी तेथे देखील एका शेतकऱ्याने त्यांना आर्थिक मदत दिली आहे. (farmer gave financial help to lanke)

स्वाभिमान जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून लोक भरभरुन प्रेम देत आहेत. प्रत्येक सभेत आपल्याला आर्थिक मदत मिळत आहे. शेतकरी कांद्याची पट्टी, सेवा निवृत्त शिक्षकांने एक महिन्याची पेन्शन दिल्याचा किस्सा देखील लंके यांनी यावेळी सांगीतला. फक्त किस्से सांगितले नाही, तर पुरावा म्हणून त्यांनी खिशातील ५०० रुपयांची नोटा देखील काढून दाखवल्यात.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आता लंकेंनी जोरदार प्रचार करण्यास सुरूवात केल्याचं दिसतंय. लोक मला नोट आणि व्होटही देतात, या वक्तव्याने ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

Latest Posts

Don't Miss