Saturday, January 18, 2025

Latest Posts

हे झेंडे फडकवणारी लोकं भाजपचे सर्व पेड वर्कर – खा. राऊत

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : आगामी विधानसभा निवडणुका बघता सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.( Aaditya Thackeray in Sambhajinagar) आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला भाजपकडून विरोध केला जात आहे. (BJp oppose Aaditya Thackeray) छत्रपती संभाजीनगरममधील रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमने-सामने आले. आता या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हे झेंडे फडकवणारी लोकं भाजपचे सर्व पेड वर्कर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.(Sanjay Raut Slam Bjp )

“भाजपकडे सध्या काही काम नाही. भाजप पक्ष हा एक भ्रमिष्ट पक्ष आहे. या राज्यात त्यांचे सरकार आल्यापासून महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात २७ ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आहेत.(Sanjay Raut on Badlapur) त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग भाजपचे कार्यकर्ते बनावट प्रकरणं निर्माण करतात. खरं तर ते भाजपचे कार्यकर्ते नसून पगारी नोकर आहेत.(They Are Paid Worker of BJP) त्यांचं आयटी सेल, झेंडे फडकवणारी लोकं हे सर्व पेड वर्कर आहेत”, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.

“भाजपचे हे लोक महाविकासआघाडीबद्दल ज्या भूमिका घेत आहेत, त्या बनावट आणि खोटारड्या भूमिका आहेत. त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर थेट अशाप्रकारचे आरोप आहे. फक्त आरोप नाही, तर त्या महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता. ते मंत्री भाजपच्या मंत्रिमंडळात बसले आहेत. त्यामुळे आधी जा आणि फडणवीसांना सांगा की त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकालपट्टी करा.(Take resignation of that 2 minister) त्यानंतर मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा”, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

Latest Posts

Don't Miss