Saturday, January 11, 2025

Latest Posts

भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचा गंभीर आरोप

Indian Chess Player Divya Deshmukh Latest News : १८ वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने नेदरलँड्समध्ये झालेल्या टाटा स्टिल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत लैंगिक नजरांचा आणि तशाच प्रकारच्या वागणुकीचा सामना करावा लागल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Divya Deshmukh serious allegations) प्रेक्षकांना महिला बुद्धिबळपटूंच्या खेळापेक्षा त्या कशा दिसतात? कसे कपडे घालतात? कशा वावरतात, त्यांचे केस कसे आहेत यावर लक्ष केंद्रीत करण्यात जास्त रस असतो असं दिव्याने म्हटलं आहे. (People Focused On Me Rather Than My Game)दिव्याने इंस्टाग्राम पोस्ट करत आपल्या मनातला संताप व्यक्त केला आहे.

काय आहे दिव्याची इंस्टाग्राम पोस्ट?

मागच्या काही दिवसांपासून ही गोष्ट मनात होती. मात्र मी माझी बुद्धिबळ स्पर्धा संपण्याची वाट पाहात होते. मी हे कायमच पाहिलं आहे की बुद्धिबळ स्पर्धा सुरु असताना प्रेक्षक ती स्पर्धा किंवा आमचा खेळ गांभीर्याने घेत नाहीत. टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेसाठी मी नेदरलँडला गेले होते. ती स्पर्धा खूप चांगली होती. मी तिथे काही सामने खेळले आणि मला ती स्पर्धा आणि तिथलं आयोजनही आवडलं. मात्र स्पर्धकांनी मला सांगितलं तसंच मीही अनुभव घेतला की प्रेक्षकांना आमचा (महिला बुद्धिबळपटू) खेळ कसा सुरु आहे यापेक्षा माझे कपडे कसे आहेत?, केस कसे बांधले आहेत, तसंच इतर गोष्टी कशा आहेत? यावर लक्ष केंद्रीत करायला आवडतं. जे पुरुष खेळाडू होते त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचं काम प्रेक्षक करत होते. मात्र जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा बहुतांश प्रेक्षक मी कशी दिसते?, माझे कपडे कुठले आहेत? मी कशी वावरते आहे? याकडे लक्ष देत होते. मी बुद्धिबळ कशी खेळते आहे? याच्याशी त्या प्रेक्षकांना काही घेणंदेणं नव्हतं.

महिला खेळाडूंच्या कपड्यांकडे जास्त लक्ष दिलं जातं

आपल्या पोस्टमध्ये दिव्या पुढे म्हणते, “जेव्हा महिला बुद्धिबळपटू बुद्धिबळ खेळतात तेव्हा त्या किती चांगलं खेळत आहेत याकडे दुर्लक्ष केलं जातं. जो खेळ महिला बुद्धिबळपटू करतात तिथे त्यांची बुद्धी खरोखरच पणाला लागलेली असते. मी जेव्हा मुलाखत देत होते तेव्हाही मी पाहिलं की लोक माझा खेळ कसा आहे याकडे न पाहता माझ्या शरीराकडे, माझ्या कपड्यांकडे, केसांकडे पाहात होते. मी कसा खेळ केला आणि मला काय अडचणी आल्या? हे जाणून घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती.”

मी आत्ता जेमतेम १८ वर्षांची आहे पण..

त्यानंतर दिव्या म्हणाली, “मी आत्ता जेमतेम १८ वर्षांची आहे. (I M Only Eighteen Says Divya) महिलांची प्रगती मोठ्या प्रमाणावर होते आहे. मात्र महिला खेळाडूंना अशा प्रकारच्या दुर्व्यवहार सहन करावा लागतो. कायमच त्यांच्या खेळापेक्षा कपडे, फॅशन आणि इतर गोष्टींवर चर्चा केली जाते. महिला खेळाडूंचं मोठ्या प्रमाणावर कौतुकही होत नाही. त्यांच्याबद्दल वाईटच बोललं जातं. मी जेव्हापासून खेळ खेळू लागले आहे तेव्हापासून मी अशा वाईट नजरांचा आणि तिरस्काराचा सामना जास्त केला आहे. (Divya Deshmukh alleges sexism) महिला बुद्धिबळपटू असोत किंवा अॅथलिट असोत त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे” असं दिव्याने म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss