Saturday, January 18, 2025

Latest Posts

बारामती विधानसभेचा ‘दादा’ बदलण्याची मागणी

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागे साडेसाती सुरु असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. एकामागून एक धक्क्यांची मालिका सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचा एकच खासदार निवडून आला.(Only 1 Mp of Ajit Pawar Group) तर मोदी कॅबिनेटमध्ये पण त्यांना स्थान मिळाले नाही. (No ministery for Ajit Pawar’s Mp) विधानसभेची मोर्चे बांधणी सुरु करण्यापूर्वीच बारामतीमधील नागरिकांना आता दादांना बदलण्याची मागणी केली आहे. (People Demand For Change in Baramati Vidhansabha) बारामतीतून नवीन चेहरा देण्याचे साकडे काही जणांनी शरद पवार यांना घातले आहे.

आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहेत.(People Demand to Change DADA of Baramati) शरद पवार हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.(yugendra Pawar From Baramati Vidhansabha) गोविंद बागेत भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या पवारांसमोर सध्याच्या राजकीय नेत्याविषयी खंत व्यक्त केली.(Goving Bagh Baramati)

बारामतीत मध्ये विधानसभेला पवार विरुध्द पवार होणार नाही कारण अजित पवारांनी शब्द दिला होता की जर लोकसभेला सुनेत्रा पवार पडल्या तर मी विधानसभा लढणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (People Demand for yugendra Pawar in Baramati vidhansabha )युगेंद्र पवार यांना बारामती मधून उमेदवारी द्या या मागणीसाठी बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंद बागेत आले होते.

शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. (Sharad Pawar In Baramati) ते मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करतील. त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच गोविंद बागेत नागरिकांनी गर्दी केली आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये अजित पवार यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी राष्ट्रवादीत उभी फुट पडली नव्हती. त्यावेळी अजित पवार यांना 1,95,641 मते पडली होती. तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांना 30,376 मते पडली होती. अजितदादांनी पडळकर यांचा 1,65,265 मतांनी पराभव केला होता.

Latest Posts

Don't Miss