Sunday, January 12, 2025

Latest Posts

अवकाळी पावसाच्या नुकसानीचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात माहिती

DCM Devendra Fadnavis in Nagpur: राज्यात अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अशा नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आसल्याची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 27) नागपूर येथे दिली.

नागपुरात आगमन झाल्यानंतर फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील विविध भागांना रविवारी (ता. 26) अवकाळी पाऊस व गारपिटीनं तडाखा दिला. त्यावर त्यांनी भाष्य केलं. रविवारी रात्री पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी पाऊस व गारपिटीन झाली. तर मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून  युद्धपातळीवर वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम सध्या महावितरणकडून करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना शासनस्तरावरून सूचना दिलेल्या आहेत. कुठे किती नुकसान झालंय याचा प्राथमिक अहवाल घेण्यात येत आहे. तातडीनं हा अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (DCM Devendra Fadnavis Gave Instructions To Collector For Survey Unseasonal Rain & Hail In Maharashtra) निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची मदत करण्याची असेल. सध्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं नेमके किती नुकसान झालं आहे, असे सांगणं अवघड आहे. यासंदर्भातील अहवाल प्राप्त होताच सरकार मदतीची घोषणा निश्चितपणे करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणची पीक परिस्थिती वेगवेगळी आहे. जिथे नुकसान होईल, त्या ठिकाणी सरकार नक्कीच मदत करेल असं ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss