Saturday, January 11, 2025

Latest Posts

| TOR News Network |

Raju Shetti Latest News : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं कुणीही लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.(Raju Shetti on farmer sucide) राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं. (Raju Shetti On Mahavikas Aghadi And Mahayuti)परंतु सर्वसामान्यांचा या आघाड्यांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे ‘परिवर्तन आघाडी’ तयार करण्यात आली,” अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली. (Raju shetti forms Parivartan aghadi) परिवर्तन आघाडी विधानसभेत महाविकास आघाडी व महायुतीला कितपत टक्कर देणार हे मात्र आगामी काळात स्पष्ट होईल.

 माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले “दोन्ही आघाड्यांच्या भांडणात शेतकऱ्यांचा विचार कुणीही करायला तयार नाही. (Raju Shetti on Farmer)त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र काम करणाऱ्याा चळवळीतील संघटना एकत्र आल्या आहेत. एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वेगळा पर्याय लोकांना देणार आहोत.

 सत्तेत असलेल्या लोकांना शेतकऱ्यांशी देणं-घेणं राहिलं नाही. शेतकऱ्यांच्या मनामध्ये जिव्हाळा निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी, महिला आणि विद्यार्थी यांना समोर ठेवून निवडणूक लढली पाहिजे. त्यामुळे छोट्या समविचारी संघटना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत.(Small organizations getting together) त्यासाठी 24 ऑगस्ट रोजी शेगाव येथे महत्त्वाची बैठक घेणार आहोत.(Meeting on 24th august at shegaon ) त्यामध्ये स्वतंत्र भारत पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी संघटना, बी. आर.एस. आणि शेतकरी संघटना अशा छोट्या घटकांना एकत्र घेणार आहोत.”

परिवर्तन आघाडीत कोण येणार? याबाबत राजू शेट्टी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही आमचं काम करत असून चळवळ सोडली नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये 288 जागा लढवणार आहोत.(Raju Shetti to contest 288 seats in vidhansabha) या आघाडीत मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांच्याशी चर्चा झाली आहे. (Raju shetti on jarange patil,bacchu kadu)स मविचारी असलेले घटक आम्ही सोबत घेणार आहोत. बच्चू कडू यांनी आमच्यासोबत यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ते आले तर त्यांचा स्वागतच आहे. आमची दोन वेळा बैठकदेखील झाली आहेत. भविष्यात ते आमच्यासोबत येऊ शकतात. तर रविकांत तुपकर जरी आले तरी त्यांचं स्वागत असेल. ते आमचे शत्रू नाहीत.”(Raju shetti on ravikant tupkar)

 “सत्ताधारी आणि विरोधात असलेल्या मोठ्या पक्षांना छोटे घटक पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी किंवा सत्ताधारी यांच्यासोबत जाणार नाही. आतापर्यंत विनायक मेटे, महादेव जानकर आणि माझ्यासह इतर छोट्या घटक पक्षांना याचा चांगला अनुभव आलेला आहे. मतांसाठी जवळ घ्यायचं आणि नंतर त्यांना संपवायचं, हे काम केलं जातंय. त्यामुळे चळवळ जिवंत राहावी, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत

Latest Posts

Don't Miss