Saturday, January 11, 2025

Latest Posts

मुंडे साहेबांचा मृत्यू पचवला पण माझा पराभव… 

| TOR News Network |

Pankaja Munde Latest News : पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या कार्यकर्त्याने आत्महत्या केली. त्यांने आपण हादरून गेल्याचे पंकजा यांनी सांगितले. पराभवाची बातमी समोर आल्यानंतर त्या दिवशी अनेक गावांत चुली पेटल्या नाहीत. त्याचं दुख: वाटलं. शिवाय लोकांनी आत्महत्या केल्या यामुळे अस्वस्था व्हायला झालं.(Pankaja munde Party worker suicide) लोकांनी मुंडे साहेबांचा मृत्यू पचवला पण माझा पराभव ते पचवू शकले नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.(Pankaja Munde on Defeat)

बीड लोकसभा मतदार संघातून भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. 2019 च्या विधानसभेनंतर 2024 च्या लोकसभेलाही पराभव होणे हे पंकजा यांच्यासाठी मोठा धक्का समजला जातोय. शिवाय पंकजा यांचे पुढचे राजकीय भवितव्य काय? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. यात त्यांनी पराभव का झाला? पुढची राजकीय दिशा काय असणार? या आणि यासारख्या अन्य प्रश्नांना बेधडत उत्तरे मुंडे यांनी एका वाहिनी सोबत बोलताना दिले.

बीड लोकसभा निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग दिला गेला. जरांगे फॅक्टर बीडमध्ये चालला. विरोधकांनी जो नरेटिव्ह सेट केला होता त्याला यश आले. त्यामुळेच पराभवाला सामोर जावे लागले असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनाचा नक्कच फटका बसला असं ही त्या म्हणाल्या. पराभव हा पराभव असतो. तो स्विकारायचा असतो. लोकांची दिशाभूल केली गेली. मात्र ती कायम राहाणार नाही असेही त्या म्हणाल्या. निकालानंतर बीडमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसले नाही. माझा पराभव झाल्याने जिल्ह्याची एक मोठी संधी गेली असे जनतेला आता वाटत असेल असेही त्या म्हणाल्या. शिवाय मला पाडून काय साध्य झाले असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. जात हा विषय आता निवडणुकी पुरता मर्यादीत राहीला नाही. तो गंभीर झाला आहे असं सांगायला त्या विसरल्या नाहीत.

पराभव झाल्याने आपण अडगळीत पडू असे होणार नाही. विजय आणि पराभव हा एक अपघात असतो. माझ्या वडिलांनी मला बेरजेचे राजकारण शिकवलं आहे. त्यानुसार आपली पुढची वाटचाल सुरूच राहील असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आता झाली आहे. पराभव झाला हे मान्य केले आहे. जसा बीडमध्ये पराभव झाला तसा इतर राज्यात इतर पक्षांचा देखील झाला आहे. सध्याचे राजकारण अतिशय वाईट झाले आहे. नेते थेट जातीवर बोलत आहेत. जातीचे विष शाळांपर्यंत पोहचले आहे. ते जास्त गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. पण ही वेळही निघून जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Latest Posts

Don't Miss