Sunday, January 12, 2025

Latest Posts

राजकारणात माझ्यासोबत विश्वासघात झाला – पंकजा मुंडे

| TOR News Network | Pankaja Munde Statement On Her Political Carrier : राज्याच्या राजकारणात नेहमी प्रकाश झोतोत असलेल्या भाजप नेत्या पंकाजा मुंडे यांनी एक मोठे विधान केले आहे. त्या सध्या गाव चलो अभियानात सहभागी झाल्या असून त्या दौऱ्यावर आहेत. त्या या अभियानाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. बीडच्या पौंडूळ गावात त्यांनी गावकऱ्यांशी संवादादरम्यान मोठं वक्तव्य केलं आहे.त्यांमुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. (Pankaja Munde Big Statement)

भाजपकडून सध्या गाव चलो अभियान सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पंकजा मुंडे या अभियानाच्या निमित्ताने बीडच्या पौंडूळ गावात मुक्कामासाठी गेल्या आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं. “तुमच्याशिवाय मला कोणी नाही.(I have no one but you) मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. (Game Played With Me in Political )

जीवनात संघर्ष करावा लागला

तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला आज इथे कुंकू लावला, मला कडक लक्ष्मीचे रूप दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितलं. मोदी यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला. (Modi Struggle in life)त्यांना चहा विकावा लागला. शाळेत त्यांना फी भरायला पैसे नव्हते, शाळेत जाताना त्यांना अनंत अडचणी आल्या”, असंदेखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

बाबा यमराजा पुढे अपयशी ठरले

“आपल्यासाठी 2014 ची निवडणूक दुर्दैवाने चांगली ठरली नाही. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर केवळ काही दिवसात ते आपल्यातून गेले. मी 2009 मध्ये राजकारणात आले. (from 2009 i enter politics) आणि संघर्षाला सुरुवात झाली. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या असे म्हणाले. बाबा यमराजा पुढे अपयशी ठरले. मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण करायचं नाही असं सांगितलं. आपली जात केवळ वंचित आहे. त्यांच्यासाठी काम करायचं आहे”, असं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं.

रामापेक्षा रावणाने राज्य जास्त केले

“तुम्ही माझ्यावर केलेलं  प्रेम आणि मोदी यांनी सांगितलेलं काम याची मला आज जोड मिळाली. आता कामे सुरू झाले असतील. मात्र अनेक विकासकामे माझ्या काळात मंजूर झाले आहेत. रामापेक्षा रावणाने राज्य जास्त केले. ज्याने आदर्श घालून दिला त्याच रामाचे नाव आपण घेतो. रामाला वनवास भोगावा लागला. मी आज माहेरसिन म्हणून इथ मुकामी आले आहे. ताईचं काय? म्हणून मला सर्व लोक विचारतात. मुंडे साहेब गेल्यानंतर मला लोक ताईसाहेब म्हणतात. माझ्यात लोक मुंडे साहेबांना बघतात म्हणून राज्यभर मला ताईसाहेब म्हणतात”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडेंच्या भेटीवर फडणवीस म्हणाले…

 पंकजा मुंडे यांचं आवाहन

“साहेब या उपाधीला कधीही बट्टा लागणार नाही असे मला काम करायचे आहे. राम वनवासात गेले नसते तर प्रभू झाले नसते. माझ्या सहकारी आमदारांच्या मुलाला गोळी घालून मारले, मला खूप वाईट वाटले. माझ्या संघर्षात नेहमी सोबत आहात म्हणून माझा संघर्ष सोन्यासारखा झाला आहे. पुढील संघर्षात देखील तुम्ही माझ्यासोबत राहा”, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

Latest Posts

Don't Miss