संरक्षण अधिकाऱ्यांचा हल्लेखोरांवर गोळीबार
Latest Palestine News: गेल्या महिन्याभरापासून गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध चालू आहे. याचा फटका आता राष्ट्रपतींनाही बसत असल्याचे दिसून आले आहे.अशातच पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास हे जात असाताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. (Palestine President Mahmoud Abbas Convoy Attacked) या जीवघेण्या हल्ल्यातून महमूद अब्बास थोडक्यात बचावले आहेत.हा हल्ला गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश मानले जात आहे.‘सन्स ऑफ अबू जंदल’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बऱ्याच महिन्यापासून पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट ‘हमास’ने इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला सुरू केला आहे, त्यांच्या सैनिकांनी गाझा पट्टीजवळील समुदायांमध्ये प्रवेश करून रहिवाशांना ठार मारले आणि ओलीस ठेवले.अशात आता संघर्ष वाढलेला दिसून येत आहे.बुधवारी हल्लेखोरांनी थेट पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांना टार्गेट केले आहे. भर रस्त्यात हल्लेखोर आणि संरक्षण दलातील जवानांमध्ये बराच वेळ ही चकमक सुरू होती. जवानांच्या तीव्र प्रतिकारानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी संरक्षण अस्थापनांमध्ये घुसून हा हल्ला करण्यात आला होता.सन्स ऑफ अबू जंदल संघटनेने पॅलेस्टिनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांना इस्रायलवर कारवाई करण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. परंतु, अब्बास यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असं म्हणत सन्स ऑफ अबू जंदल संघटनेने महमूद अब्बास यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. परंतु, संरक्षण दलातील जवानांमुळे महबूद अब्बास थोडक्यात बचावले.