Monday, January 13, 2025

Latest Posts

स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स ठरल्या अपयशी

Ind VS Eng Womens T-20 Cricket 2023 : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये इंग्लंड संघाने 38 धावांनी विजय मिळवत आहे. ( Engalnd Women Beat India Women In First T20) या विजयासह इंग्लंड संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे. सलामीवीर शेफामी वर्माची अर्धशतकी खेळी वाया गेली असली तरी स्मृती मंधाना,जेमिमाह रॉड्रिग्स मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरल्या आहेत.

 भारत आणि  इंग्लंड महिला संघामधील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा 38 धावांनी पराभव झाला आहे. वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने 20 ओव्हरमध्ये 197-6 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाचा डाव 20 ओव्हरमध्ये 159-6 धावांवर आटोपला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत इग्लंड संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली.

इंग्लंड संघ प्रथम बॅटींगला उतरला होता, मात्र एकदम खराब सुरूवात झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये सोफिया डंकले 1 धाव  आणि अॅलिस कॅप्सी यांनी रेणूका ठाकूर सिंग हिने माघारी पाठवलं. दोघी आऊट झाल्यानंतर डॅनियल व्याट आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी भागादारी केली. दोघी आऊट झाल्यानंतर डॅनियल व्याट आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी मजबूत भागादारी केली. दोन धावांवर दोन विकेट अशी इंग्लंड संघाची अवस्था होती मात्र दोघींनीही डावाची सूत्र आपल्या हातात घेतली. भारतीय गोलदाजांची परीक्षा घेतली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये मिळालेल्या दोन विकेटनंतर भारतीय महिला गोलंदाजांना तिसऱ्या विकेटसाठी तब्बल 16 ओव्हरची वाट पाहावी लागली. डॅनियल व्याटला पदार्पण करणाऱ्या सायका इशाकने 75 धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर आलेल्या हेदर नाइटला 6 धावांवर श्रेयांका पाटीलने बोल्ड केलं. शेवटला आलेल्या एमी जोन्स हिने अवघ्या 9 बॉलमध्ये 23 धावा केल्या. नॅट सायव्हर-ब्रंटला 77 धावांवर रेणूक सिंह ठाकूर हिने आऊट केलं. रेणूकाने भारताकडून सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. स्टार खेळाडू स्मृती मंधाना अवघ्या 6 धावांवर आऊट झाली. सहाव्या ओव्हरमध्ये जेमिमाह रॉड्रिग्स 4 धावा करून परतली. एकीकडे विकेट पडत असताना शेफाली वर्माने आपला दांडपट्टा सुरू ठेवला होता. हरमनप्रीत कौरनेही मोठे फटके मारले, तीन चौकार आणि 1 षटकार मारत इंग्लंडवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र 11 व्या ओव्हरमध्ये तिला 26 धावांवर सारा ग्लेनने बोल्ड केलं.  रिचा घोषलाही फार काही चमक दाखवता आली नाही. 21 धावांवर आईट झाली. विकेट पडत असल्याने दवाब वाढत गेला आणि अर्धशतक केलेली शेफालीसुद्धा 52 धावांवर आऊट झाली. विकेट गेल्याने चेंडू कमी राहिले आणि धावा जास्त अखेर भारताचा 38 धावांनी पराभव झाला.

 

Latest Posts

Don't Miss