Tuesday, January 14, 2025

Latest Posts

पहिले मोदी अडनाव, मग सावरकर आता पनवती: Panauti Modi

राहुल गांधी आणि त्यांचे वादग्रस्त वक्तव्य

Rahul Gandhi Statements Latest News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये.त्यांनी आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यात त्यांनी पहिले मोदी आडनावाबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. तसेच भारत जोडो यात्रेत त्यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशात रान पेटले होते. अन् आता त्यांनी परत पंतप्रधान यांना पनवती असल्याचे वक्तव्य केले आहे. (Congress Leader Rahul Gandhi In Trouble- Says ‘Panauti’ to PM Narendra Modi)

राहुल गांधी यांनी 2019 च्या निवडणुकीत कर्नाटकाच्या कोलार जिल्ह्यात झालेल्या जाहिर सभेत मोदी अडणावार टीका केली होता.ते म्हणाले होते सर्व मोदी चोर का असतात.च्यामुळे त्यांना भाजपाने सुरतच्या कोर्टातही खेचण्यात आले होते.मोदी आडनावाबाबत बदनामी प्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.तर नोव्हेंबर 2022 मध्ये, भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी वाशिम जिल्ह्यात आयोजित सभेत सावरकरांबद्दल भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. ते म्हणाले होते की, एकीकडे ब्रिटिशांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे आणि दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत.ते म्हणाले होते की, सावरकरजी, ते दोन-तीन वर्षे अंदमानात बंदिस्त होते, म्हणून त्यांनी पत्रे लिहायला सुरुवात केली की आम्हाला माफ करा, तुम्हाला जे हवे ते घ्या, मला तुरुंगातून बाहेर काढा. अशी टीका त्यांनी केली होती.यानंतर भाजपने राहुल गांधी यांना चांगलेच धारेवर धरत देशभरात आंदोलन केले होते. त्यानंतर आता परत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.सध्या देशातील काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत.नुकतीच राहुल यांची जालोरमध्ये मोठी रॅली झाली.यावेठी त्यांनी वर्ल्ड कप सामन्याचा उल्लेख करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. काहीही असेल आपली टीम जिंकली असती. पण पनवतीने पराभूत केलं, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे, राहुल गांधी यांच्या टीकेवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल यांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा पराभव झाला. त्यामुळे त्याच दिवशी अचानक पनवती हा शब्द ट्विटरवर ट्रेंड करत होता. त्यामुळे विरोधकांनीही त्याचा आधार घेत पंतप्रधानांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Latest Posts

Don't Miss