Thursday, January 16, 2025

Latest Posts

अबकी बार 400 पार मात्र सर्वे मध्ये भाजपला धक्का

| TOR News Network | Loksabha Opinion Polls Prediction 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? पुन्हा भाजपा सरकार सत्तेवर येणार की नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला सत्तेची खुर्ची मिळणार? कोणाच्या किती जागा निवडून येणार? राज्या-राज्यात कोणाच्या बाजूने लोकांचा कौल आहे आदी विविध विषयांवर गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू आहे. या चर्चांमध्ये आता अनेक माध्यमांचे अंदाज समोर येऊ लागले आहेत. इंडिया टुडे मूड ऑफ नेशनचा अंदाज आता समोर आला असून त्यानुसार कोणाच्या पारड्यात किती जागा मिळणार याचे अंदाज बांधण्यात आले आहेत.(How Many Seats Will Win BJP In Loksabha)

इंडिया टुडेचा ‘द मूड ऑफ द नेशन्स फेब्रुवारी २०२४’ हा सर्व्हे सर्व लोकसभेतील ३५,८०१ प्रतिसादकर्त्यांच्या आधारावर बेतलेला आहे. १५ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या काळात हे सर्वेक्षण केले गेले.

भाजपाच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA ला पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यात यश येणार आहे. परंतु, यंदाच्या निवडणुकीत एनडीए ४०० पार करू शकणार नाही, असं अंदाजात वर्तवण्यात आलं आहे. (Ab ki baar charso paar seems in Trouble)

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ३३५ जागा जिंकू शकेल. सरकार स्थापनेसाठी २७२ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपा आरामात सत्ता स्थापन करू शकेल. परंतु, एनडीए या निवडणुकीत १८ जागांवर अपयशी होऊ शकते, याचा फायदा इंडिया आघाडीला होणार असल्याचंही सर्वेतून समोर आलं आहे.

इंडिया आघाडीला किती जागा मिळणार?

आगामी लोकसभा निवडणूक NDA विरूद्ध INDIA आघाडी अशी होणार आहे. (BJP And India Aghadi) त्यामुळे एनडीएला ३३५ जागा मिळणार असून इंडिया आघाडीला १६६ जागांवर समाधान मानावं लागणार असल्याची चिन्हे आहेत.पक्षनिहाय विचार केल्यास भाजपाला ५४३ जागांपैकी ३०४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला ७१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित १६९ जागांवर स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss