Sunday, January 12, 2025

Latest Posts

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार

रामभद्राचार्यांच्या भविष्यवाणीची देशभर चर्चा

Modi Will Become PM In 2024 : देशात आणि राज्यात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी सभा, भेटीगाठी, रॅली अशा पद्धतीने प्रचार सुरु केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक कोण जिंकणार असे अंदाज देखील आता बांधले जावू लागले आहेत. अशात अध्यात्मिक गुरु रामभद्राचार्य यांनी वर्तवलेल्या अंदाजाची जोरदार चर्चा सुरु आहे.(Spiritual guru rambhadracharya big statement)

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात देशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये गुरू रामभद्राचार्य देखील सहभागी झाले होते. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गुरु रामभद्राचार्य भावुक झालेले दिसले. अभिषेक झाल्यानंतर गुरु रामभद्राचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
गुरू रामभद्राचार्य यांनी म्हटलं की,मी सध्या भावुक झालो आहे. प्रभू राम वनवासातून परत येण्याच्या वेळी वशिष्ठजींची जी परिस्थिती होती, तशीच आज माझी स्थिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर गुरु रामभद्राचार्य म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहज जिंकतील.(Modi will win easyily in 2024 elections)आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला आहे. मोदींना आमचा आशीर्वाद आहे, ते सदैव प्रसन्न राहतील.
गुरु रामभद्राचार्य यांनी याआधी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होती अशी भविष्यवाणी केली आहे.

Latest Posts

Don't Miss