Sunday, January 12, 2025

Latest Posts

महिलादिनी PM मोदींची मोठी घोषणा

| TOR News Network | LPG Price Reduced News: महिलादिनानिमित्त केंद्र सरकाराने महिलांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने घरगुती सिलिंडरवर १०० रुपयांनी कपात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.या संर्भात पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट देखील केले आहे. (Mahila Din LPG Price reduce)

महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या दरात आम्ही १०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच, शिवाय कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं याहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली. यामुळे महागाईने पिचलेल्या जनेतला काही प्रमाणात दिलासा मिळेल. २०२४ मध्ये निवडणुका असल्यामुळे सिलिंडरच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता होती. अशातच केंद्र सरकारने १०० रुपयांनी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे.

Latest Posts

Don't Miss