Saturday, January 18, 2025

Latest Posts

राज्यात या तारखेला आचारसंहिता तर या तारखेला होणार मतदान

| TOR News Network |

Maharashtra Vidhansabha Election Date : महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपतेय. त्याआधी निवडणुका आणि निकाल येवून नव्या सरकारचा शपथविधी होणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनाच आता आचारसंहिता कधी लागणार व निवडणुकांसह मतदान कधी होणार या तारखांबद्दल कमालीची उत्सुक्ता लागली आहे. (Vidhansabha voting date in maharashtra) याच संदर्भात महायुतीच्या दोन बड्या नेत्यांनी भाष्य केले आहे.

शिंदेंचे आमदार भरत गोगावलेंनी, निवडणुकीची तारीख सांगितली आहे.(Bharat gogavle on vidhansabha election date) त्यांच्या मते ५ ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा होईल आणि १०  ते १२  नोव्हेंबरपर्यंत मतदान असेल, असं गोगावले म्हणालेत.तर गिरीश महाजनांनीही १० ते १५  दिवसांत घोषणा होणार असल्याचं म्हटलंय. (girish majahan on vidhansabha election 2024) त्यामुळं आता महावितास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचे चक्र जोरात फिरताना दिसत आहे. जागा वाटपावरुन मुंबईतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते. (Mahavikas aghadi seat sharing meeting)

मुंबईतल्या ३६ पैकी ३० जागांवर चर्चा झाली असून जवळपास जागा वाटप पूर्ण झालंय. ६-७  जागांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल पुढचे २ दिवस उर्वरित महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होणार आहे. २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत. जिंकलेल्या जागा सोडून इतर जागांवर पक्षाची ताकद पाहून कोण उमेदवार असेल यावरही चर्चा झालीय. मेरिटनुसार जागा वाटप केलं जाणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलंय.

महायुतीचीही जागा वाटपाची बैठक २ दिवसांत होईल आणि ८ दिवसांत काही उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल, असं संजय शिरसाट म्हणालेत.(Sanjay shirsat on Mahayuti final eat sharing) इकडे मुख्यमंत्रिपदावरुन गिरीश महाजन आणि बावनकुळेंनी भाजपकडून फडणवीसांचं नाव घेतलं. संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रात यावेळी महिनाभर निवडणुका उशीरानं होत आहेत..पुढच्या १५- ५०  दिवसांत प्रचाराचा जोरही सुरु होईल.

Latest Posts

Don't Miss