Thursday, January 30, 2025

Latest Posts

मराठा आरक्षणा संदर्भात पहिली याचिका दाखल

ओबीसी संघटनेने मुंबई हायकोर्टात घेतली धाव

First Petition Filed Against Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन ओबीसी संघटना आक्रमक झाली आहे.ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी यावर टीका करत मराठा आरक्षणावर आपला आक्षेप नोंदवला होता.त्यामुळे आता  मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला ओबीसी संघटनांकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे.(Obc In High Court On Maratha Reservation)

प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारीच्या (GR) मसुद्याला ओबीसी संघटनेचे कोर्टात आव्हान दिले आहे.ओबीसी वेल्फेयर फाऊंडेशन तर्फे अॅड. मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्चं न्यायालयात याचिका दाखल केली. (Maratha Reservation issue in high Court)संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत, त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाने २६ जानेवारी रोजी अधिसूचना काढून सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं नोटिफिकेशन काढलं असून १६ फेब्रुवारीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाला ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी संघटनांनी विरोध केला होता. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी मंगळवारी इशारा दिला. ‘जर ते सगेसोयऱ्यांच्या बाबतीत कोर्टात गेले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करेन’ असं जरांगे म्हणालेत. (Jarange Patil Warns Obc) त्यामुळे आता दोन्ही गटाकडून न्यायालयीन लढाया लढल्या जाण्याची शक्यता आहे.(Maratha Obc will Fight in High Court)

Latest Posts

Don't Miss