Monday, November 18, 2024

Latest Posts

टाटा समुहाची लक्षद्वीपला मोठी भेट

बेटावर बांधणार ताजचे दोन आलिशान रिसॉर्ट

Tata Will Built Resort On Lakshadweep Island : भारत आणि लक्षद्वीपमधील संबंध तणावपूर्ण असताना टाटा समूह लक्षद्वीप या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील सुहेली आणि कदमत या दोन सुंदर बेटांवर ताज ब्रँडेड रिसॉर्ट बांधणार असल्याचे सांगितले आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने अलीकडेच या दोन बेटांवर ताज ब्रँडचे दोन रिसॉर्ट बांधण्यासाठी करार केला आहे. (Taj Hotel Group on Lakshadweep Island)

हे रिसॉर्ट्स 2026 मध्ये सुरू होतील. हे दोन्ही रिसॉर्ट स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाला धक्का न लावता बांधले जातील. सुहेली आणि कदमत बेटे त्यांच्या निळसर पाण्यासाठी, पांढर्‍या वाळूच्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

राजकीय तणावादरम्यान धोरणात्मक पाऊल

लक्षद्वीपला भारतीय पर्यटकांसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. विशेषत: भारत आणि मालदीवमधील संबंध तणावपूर्ण असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. त्यांच्या लक्षद्वीप भेटीच्या आवाहनामुळे मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताविरोधात वक्तव्ये केली. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.ताज सुहेलीमध्ये 60 बीच व्हिला आणि 50 वॉटर व्हिलासह 110 खोल्या असतील. तर ताज कदमात 110 खोल्या असतील ज्यात 75 बीच व्हिला आणि 35 वॉटर व्हिला असतील.

वाद कसा सुरू झाला?

पीएम मोदींनी 4 जानेवारीला त्यांच्या लक्षद्वीप भेटीचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर लोक सोशल मीडियावर म्हणू लागले की मालदीवला जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा लक्षद्वीपला जाणे चांगले आहे.त्यामुळे मालदीवचे मंत्री आणि नेते संतप्त झाले. त्यांच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर सोशल मीडियावर भारतीय आणि मालदीव नागरिकांमध्ये युद्ध सुरू झाले. भारतातील लोकांचा संताप इतका वाढला की देशात BoycottMaldives हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

Latest Posts

Don't Miss