Monday, November 18, 2024

Latest Posts

ट्रकनंतर आता खासगी बसेससाठी डोकेदुखी ठरणार हा नवा कायदा

प्रस्ताव तयार : मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठवला

Private Buses Accident New Rule : केंद्र सरकारच्या हिट अँड रनचा नवीन कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केला. हा वाद थंडा होत नाही तर आता खासगी बस चालकांसाठी नवा कायदा येण्याच्या तयारीत आहे. यात खासगी लक्झरी बसला अपघात झाल्यास मालकही दोषी ठरणार आहे. भीषण अपघाताची जबाबदारी चालकाबरोबरच मालकावरही टाकणारा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्राला प्रस्ताव पाठवला. त्यामुळे आता या प्रस्तावावरुन खासगी बस चालकांची डोकेदुखी वाढणार असून यावरुन  वाद होण्याची चिन्हे आहेत. (Luxury Private Buses Accident New Law)

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खासगी लक्झरी बसची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या गाड्या रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत असल्याने अपघात झाल्यास अनेक प्रवाशांचे बळी जातात. आतापर्यंत या अपघाताला केवळ चालकालाच दोषी ठरवले जात होते. मात्र अनेकदा नादुरुस्त गाडी, ओव्हरलोड गाडी चालकाला चालवण्यास मालकवर्ग भाग पाडतात. यामुळे अपघात झाल्यास केवळ चालकालाच दोषी न ठरवता मालकालाही दोषी ठरवले जाणार आहे. (Luxury Buses Accident New Law) त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाने तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे.

राज्यात 80 हजारहून अधिक खासगी लक्झरी बस धावत आहे. या गाड्यांनी दररोज पाच-सहा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मालकांना दररोज लाखो रूपयांचा नफा मिळतो, परंतु चालकांची मासिक 15 ते 20 हजार रुपये वेतनावर बोळवण केली जाते. अनेकदा एकाच चालकाला आठ-दहा तास गाडी चालवण्यास भाग पाडले जाते, नादुरुस्त बस रस्त्यावर उतरवल्या जातात. त्यामुळे चालकाबरोबर मालकालाही जबाबदार धरणारा स्वतंत्र प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. खासगी लक्झरी बसचा अपघात झाल्यास त्यामध्ये अनेक प्रवाशांचे बळी जातात. या अपघाताला केवळ चालकालाच जबाबदार न धरता गाडी मालकाला जबाबदार धरणे आवश्यक आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नुकताच केंद्राला पाठवला आहे.त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latest Posts

Don't Miss