| TOR News Network |
Pooja Khedkar Latest News : आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर IAS कशा झाल्या त्यावरुन आता वाद सुरु झाला आहे. (Pooja Khedkar in trouble) आता हळूहळू त्यांच्या नियुक्तीवरुन राजकारण रंगायला लागलं आहे. अशात आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पूजा खेडकर यांच्यावर आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला आहे .(Hindu Mahasangh on pooja Khedkar ) यामुळे त्यांच्या समाजातील गरजूवर अन्याय झाला आहे असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. “पूजा खेडकर यांचे वडील, आजोबा सशक्त आहेत, तुम्ही सरकारी नोकरीमध्ये ऑडी सारखी गाडी घेऊन जाता.(probationary IAS officer Dr Puja Khedkar Audi Car) यामुळे हे सिद्ध होतं की, तुम्ही आरक्षणाचा गैरफायदा घेत आहात आणि सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो” असं आनंद दवे यांनी म्हटलय.(Pooja Khedkar ias Case )
“खुल्या गटातील लोकांवर कायमच अन्याय होतो. सध्या नव्याने जे IAS उत्तीर्ण झाले आहेत, त्यांची कागदपत्र शासनाने तपासून घेतली आहेत का?” असा आनंद दवे यांनी सरकारला सवाल विचारला आहे.(Anand Dave on Pooja Khedkar Documents) माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर आणली आहे. डॉ. पूजा खेडकर यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.(serious allegation on pooja Khedkar assets)
पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांकडे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र असून 110 एकर शेतजमीन आहे. ही मालमत्ता म्हणजे शेतजमीन कमाल मर्यादा कायद्याचे उल्लंघन आहे, असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे.(vijay kumbar allegation on pooja assets) 1.6 लाख चौरस फुटाची 6 दुकान आहेत. 7 फ्लॅट असून यात हिरानंदानी या पॉश वस्तीत एक फ्लॅट आहे. 900 ग्रॅम सोने, हिरे, 17 लाख रुपये किंमतीच सोन्याचं घड्याळ आहे.(17 lakh watch) 4 कार, दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी आणि एक ऑटोमोबाईल कंपनी आहे. स्वत: पूजाकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे. (Pooja Khedkar 17 cr Asset) याची चौकशी व्हायला नको का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विचारला आहे. (Rti vijay kumbhar on pooja khedkar)