Saturday, January 18, 2025

Latest Posts

अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही ; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

| TOR News Network |

Justice Chandiwal Latest News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे (Anil Deshmukh 100 crore bribery case) आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Commission) यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही असं म्हटलंय. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत न्या. चांदीवाल यांनी स्फोटक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केलेत. (Justice Chandiwal Shocking Statement)

योग्य पुरावे आयोगासमोर समोर येऊ दिले नाहीत असं न्या. चांदीवाल यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही असा आरोप अनिल देशमुख वारंवार करतात. मात्र अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा न्या. चांदीवाल यांनी सपशेल फेटाळला आहे. (No clean chit to anil Deshmukh)

गृहमंत्री असताना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला. या संपूर्ण चौकशीनंतर आयोगाने दिलेल्या अहवालात मला क्लीन चिट देण्यात आली. मात्र राज्य सरकारने हा अहवाल मला क्लीनचिट मिळाल्यामुळे जाणीवपूर्वक दडवून ठेवला असल्याचा आरोप अनिल देशमुख वारंवार करताना दिसतात. मात्र न्या. चांदीवाल यांनी अनिल देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाहीय, असा खळबळजनक दावा केला आहे.(chandiwal on anil deshmukh)

अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिलेली नाही. मी माझ्या अहवालात क्लीनचीट हा शब्दच वापरला नाहीय. परमबीर सिंह यांनी जी माघार घेतली, त्याबद्दल मी माझ्या अहवालात टीका केली आहे. पण मी क्लिनचीट दिलेली नाही. साक्षी पुरावा आला नाही. अहवालात पुरावा नाही असं म्हटलं आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाही. पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असतं, असं चांदीवल यांनी म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss