Sunday, January 12, 2025

Latest Posts

फडणवीसांना भेटताच जप्तीची कारवाई टळली : अभिजीत पाटलांना दिलासा

| TOR News Network | Abhijit Patil Latest News : राज्य सहकारी बँकेने डी.आर.डी न्यायालयात त्यांचे म्हणणे मांडल्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील (Shri Vitthal Sahakari Sakhar Karkhana) जप्तीची कारवाई टळली आहे. (Seizure action avoided on sakhar karkhana) यामुळे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. (Abhijit patil meet devendra fadnavis)

या जप्तीच्या कारवाई नंतर पंढरपुरात राजकीय घडामोडी घडल्या. (Pandharpur latest news )राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली.(Abhijit patil left sharad pawar ncp ) अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला.(Abhijit patil support bjp)

अभिजीत पाटील म्हणाले 342 कोटी रुपये थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बॅंकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. डी.आर.डी न्यायालयात बॅंकेने म्हणणे सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर जप्तीची कारवाई रद्द झाली आहे.
(action canceled after court order)

दरम्यान उद्या आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल साखर कारखान्यावर भाजप उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत असेही पाटील यांनी नमूद केले. (Will support Bjp candidate at presence of fadnavis)

Latest Posts

Don't Miss