Saturday, January 11, 2025

Latest Posts

आंतरसंस्था टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मनपा संघ विजेता

| TOR News Network |

NMC Team Got Victory In Inter Institutional Tennis Ball Cricket Tournament : नागपूर. क्रेडाई नागपूर संस्थेद्वारा आयोजित आंतरसंस्था टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नागपूर महानगरपालिका संघ विजेता ठरला. (NMC Team Winner) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
दाभा येथील दिल्ली पब्लिक स्कूल  मैदानावर शनिवार १० व रविवार ११ रोजी आंतरसंस्था टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत खेळविण्यात आली, स्पर्धेत कलेक्टर एलेव्हन, नागपूर महानगरपालिका, महामेट्रो, क्रेडाई, एस.बी.आय. यांचासह १२ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नागपूर महानगरपालिका संघाने महामेट्रो संघाचा ६ विकेटने पराभव करीत “क्रेडाई ट्रॉफी” आपल्या नावे केली.
अंतिम सामन्यात प्रथम गोलंदाजी करत नागपूर महानगरपालिका संघाने महामेट्रो संघाला ८ षटकात ४७ धावांवर रोखले, तर फलंदाजी करीत नागपूर महानगरपालिका संघाने ७.१ षटकात ४ बाद ४८ धावा करीत विजय संपादित केला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून मनपा संघाचे श्री. प्रवीण गिरी यांना गौरविण्यात आले, विशेष म्हणजे, स्पर्धेत कलेक्टर एलेव्हन विरुद्ध मनपा अशा लीग सामन्यात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी १६ चेंडूत, १ चौकरसह १५ धावा केल्या होत्या तसेच श्री. पापा यांनी ३२ धावांचे योगदान दिले होते. स्पर्धेत विजेता ठरलेल्या मनपा खेळाडूंचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss