Saturday, January 18, 2025

Latest Posts

राणेंचा मतदारांना इशारा की धमकी, लीड कमी मिळाली तर….

sindhudurg Lok Sabha Election: सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या जागेवर शिवसेनेकडून दावा केला जात असल्यामुळे अद्याप उमेदवारी जाहीर केली गेली नाही. परंतु नारायण राणे यांनी प्रचार सुरु केला आहे. आता या प्रचार दरम्यान नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सरपंचांना दमच भरला आहे. (Nitesh rane warning to sarpanch) मला हवं तसं लीड मिळालं नाही तर तुम्हाला पाहिजे असलेला निधी देखील मिळाला नाही, (no funds if lead go less) असे झाल्यावर परत माझ्याकडे तक्रार करू नका, असा इशाराच नितेश राणे यांनी मतदारांना दिला आहे.(nitesh rane straight warning)

नितेश राणेंच्या या वक्तव्याची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. हा इशारा होती की धमकी होती? असा प्रश्न यावर विरोधक विचारत आहेत.(Was it a warning or a threat) कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना आमदार नितेश राणे यांनी असं विधान केलंय. या वक्तव्यावरून ते पुन्हा सरपंचांना सज्जड दम देत असल्याचं म्हटलं जातंय. सर्वांचा हिशोब ४ जूनला होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (everyones calculation will on 4th june) नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांवेळी ज्या यंत्रणा राबवल्या त्याच यंत्रणा आता देखील वापरा. तसेच राणे साहेबांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या, असा इशाराच नितेश राणे यांनी कणकवली देवगड मतदारसंघातील सरपंचांना दिला आहे.(Rane Saheb must be won with huge majority)

नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. नारायण राणे म्हणाले, संजय राऊत वेडा झालाय. खरच वेडा झालाय.(Sanjay raut gone mad) मोदी साहेब म्हणे उद्धव ठाकरेंना घाबरतात. तुमचे पाच खासदार आणि मोदी साहेब यांना घाबरणार. अतिरेकी कारवाया करणाऱ्या शेजारच्या देशांना मोदींनी सांगितलय अतिरेकी कारवाया कराल तर घुसून मारू….असे आमचे मोदी साहेब. मग या शेंबड्या उद्धव ठाकरेला मोदी घाबरणार का?

Latest Posts

Don't Miss